आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आतड्यांचे कार्य आणि यकृताचे आजार बळावण्याचा संबंध आहे. खाण्याच्या अयोग्य सवयींमुळे लठ्ठपणा, मद्यपान सेवन, हेपॅटिक व्हायरसचा संसर्ग, गंभीर संसर्जजन्य घटक किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ गट मायक्रोबायोम्स असा परिणाम यकृतावर दिसून येतो.आतड्यांचे गंभीर आणि इन्फ्लेमेटरी अशा आजारांमुळे यकृताचे आजार बळावतात.आपल्या शरीरात लिव्हर हा मल्टिटास्किंग असा भाग असून फॅट डायजेस्ट करणे, पेशींची पुननिर्मिती, भविष्यात वापरासाठी ऊर्जा साठवणे, पचनमार्गातून रक्त फिल्टर करणे,घातक अशा विविध टॉक्सिन्सपासून संरक्षण देणे,अशी विविध कामे यकृत करत असते.
यासाठी यकृत निरोगी राहणे महत्वाचे असते. यकृताला हानी पोहोचल्यास ते पूर्वपदावर आणता येते. सातत अथवा दीर्घकाळ दुखापतीमुळे यकृतावर व्रण राहू शकतात.यामुळे सिरोसिस होऊ शकतो, ज्यामध्ये यकृत सामान्यपणे कार्य करण्यास सक्षम राहत नाही. मागील काही वर्षात यकृताचे आजार आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण विलक्षण वाढले आहे. यामध्ये अल्कोहोलिक लिव्हर डिसिज आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज यांचा समावेश आहे. यामुळे लिव्हर सिरोसिस किंवा हेपॅटोसेल्युर कार्सिनोमा होऊ शकतो.
डायजेस्टिव्ह डिसॉर्डरमुळे यकृतावर परिणाम होऊन लठ्ठपणा, इन्फ्लेमेटरी बाऊल डिसिज, गट मायक्रोबायोम्स, व्हायरल हेपेटायटिस, असे त्रास होतात.
यासाठी यकृत निरोगी ठेवणे गरजेचे आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी जास्त फॅट, साखर, मीठ असलेले पदार्थ खाऊ नये. तळलेले पदार्थ, जंकफूड, पॅक फूड जास्त खाऊ नये. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले सीफूड आणि मांस खाणे टाळावे. मद्यपान आणि यकृताच्या आरोग्याबाबत डॉक्टरांना महिती दिली पाहिजे. यकृतावर मद्यपान अवलंबून असते. डॉक्टरांनी मद्यपानाला परवानगी दिल्यास पुरुषांनी २ ड्रिंक आणि महिलांनी एका ड्रिंकपेक्षा जास्त ड्रिंक घेऊ नये. समतोल आहार घ्यावा. धान्य, फळे, भाज्या, मांस, कडधान्य, दूध आणि तेल अशा सर्व पदार्थांचा समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थ खावीत. फळे, भाज्या, व्होल ग्रेन ब्रेड, भात, सेरेल्स या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची फायबरची गरज पूर्ण होते. नियमित भरपूर पाणी प्यावे. यामुळे यकृताचं कार्य चांगले होते.