• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 14, 2019
in माझं आराेग्य
0
theripi

पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन -किमोथेरपी म्हणजे कॅन्सरच्या विरोधात वापरली जाणारी औषधे. ही औषधे गोळ्यांच्या माध्यमातून किंवा आयव्ही लाइनद्वारे रुग्णांना दिली जातात.आयव्ही औषधांची ६ ते ८ चक्रं द्यावी लागतात. या चक्रांमध्ये ३ आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते. अनेकदा काही औषधे आठवड्यातून एकदा दिली जातात.

केमोथेरपीच्या औषधांबद्दल अनेक चुकीचे समज आहेत. मात्र काही पेशंटना या औषधांमुळे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य काळजी घेतल्यास केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळता येतात. केमो घेतल्यानंतर काही पेशंटना मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा त्रास आटोक्यात आला आहे. केमोथेरपीचा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे पांढऱ्या पेशी कमी होणे. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग होऊ नये यासाठी वैद्यकीय परिभाषेत ग्रोथ फॅक्टरचा वापर करण्यात येतो. थेरपी सुरू केल्यानंतर केस जातात, ते ५ ते ६ महिन्यांनंतर पुन्हा येतात.

केमोथेरपी सुरू असताना पाणी उकळून प्यावे, कच्चे पदार्थ खाणे टाळावे, गर्दीमध्ये जाऊ नये, जनसंपर्क टाळावा, नाकावर मास्क लावावा, फळे साली काढून खावीत. टार्गेटेड थेरपीची औषधे ही केवळ कॅन्सरच्या पेशींवर वार करतात. त्यामुळे सर्वसामान्य पेशींना त्याचा त्रास होत नाही. या औषधांचा दुष्परिणाम खूप कमी होतो. अनेक कॅन्सरच्या प्रकारांमध्ये ही थेरपी उपलब्ध आहे.केमोथेरेपी घेतल्यानंतर त्या रुग्णाला काही काळ विश्रांतीची गरज असते. आणि आपले आरोग्य संभाळन्याची त्याला खूप गरज असते. त्यामुळे त्या रुग्णांने कायम खुश राहावे. मित्रमैत्रिणीत मिसळावे. जेणेकरून त्याचे आरोग्य चांगले राहू शकते.

Tags: 'केमोथेरेपी'arogyanamaBodyhealthkemo theripipuneआरोग्यआरोग्यनामापुणे
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021