आरोग्यनामा ऑनलाईन- निरोगी राहण्यासाठी योग्य आहार माहित असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आपले योग्य वजन देखील माहित असले पाहिजे. आपण वजन(weight) कमी किंवा जास्त असल्यास आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. म्हणून प्रत्येकाने त्याचे वजन योग्य वयानुसार ठेवावे. कारण योग्य वजन(weight) आपल्याला निरोगी ठेवते. आपल्याला बर्याच आजारांपासून दूर ठेवते. प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या वयानुसार किती वजन असले पाहिजे, हे जाणून घ्या.
वयाचा तक्ता
१) नवजात बाळ
नवजात मुलाचे वजन ३.३ किलो आणि मुलीचे वजन ३.२ किलो असावे.
२) ३-५ ते ६-८ महिन्यांमधील मुले
३ ते ५ महिन्यांच्या मुलाचे वजन कमीतकमी ६ किलो आणि मुलींचे वजन ५.४ किलो असावे.
आणि वय ६ ते ८ महिन्याचे असेल तर मुले ७.८ किलो व मुली ७.२ किलो असावीत.
३)९ ते ११ महिन्यांमधील मुले – मुली
९-११ महिन्यांमधील मुलांचे वजन ९.२ किलो आणि मुलींचे वजन ८.६ किलो असावे.
४) १ वर्ष
एका वर्षाच्या मुलाचे वजन १०.२ किलो आणि मुलीचे वजन ९.५ किलो असावे.
५)२ वर्ष
वयाच्या २ वर्षापर्यंत मुलाचे वजन १२.३ किलो व मुलींचे प्रमाण ११.८ किलो असावे.
६) ३-५ वर्षांची मुले- मुली
३ ते ५ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचे वजन १४ किलो ते १६ किलो पर्यंत असले पाहिजे.
७)५ वर्ष
वयाच्या ५ व्या वर्षी मुलांचे वजन १७.८ किलो व मुली १७.७ किलो असावे.
८) ५ ते ८ वर्षाची मुले- मुली
वयाच्या सहाव्या वर्षी मुलाचे वजन २०.७ किलो असते आणि मुलींचे वजन १९.५ किलो असते. याशिवाय वयाच्या ७ ते ८ व्या वर्षी मुलाचे योग्य वजन २२ किलो ते २५ किलो आणि मुलींचे वजन २५ किलो ते २४ किलो असावे.
९)९-११ वर्षांची मुले आणि मुली
९ वर्षांत मुले २८.१ किलो व मुली २८.५ किलो असावीत. वयाच्या १० ते ११ व्या वर्षी, मुले ३१.४ किलो व ३२.२ किलो व मुली ३२.५ किलो ते ३३.७ किलो असतात.
१०) १४ वर्षाची मुले व मुली
वयाच्या १२ व्या वर्षी मुलाचे वजन ३७ किलो आणि मुलींचे वय ३८.७ किलो असावे. यानंतर, १३ वर्षांच्या वयात मुले ४०.९ किलो व मुली ४४ किलो असावी. त्याच वेळी वयाच्या १४ व्या वर्षी मुलाचे वजन ४७ किलोग्रॅम आणि मुलींचे वजन ४८ किलोग्राम असणे आवश्यक आहे.
११) १५ ते १८ वर्षे वय
वयाच्या १५-१६ व्या वर्षी मुलाचे वजन ५८ किलो आणि मुलींचे वजन ५३ किलो असणे आवश्यक आहे. वयाच्या १७ व्या वर्षी मुलाचे वजन ६२.७ किलो व मुली ५४ किलो वजनाचे असावे. यानंतर, वयाच्या १८ व्या वर्षी मुलगा ६५ किलो व मुलगी ५४ किलो असावी.
१२)१९ ते ३९ वर्षे
१९ ते २९ वयाच्या पुरुषांचे वजन ८३.४ किलो आणि महिलांचे वजन ७३.४ किलो असणे आवश्यक आहे ३० ते ३९ वर्षे वयाच्या पुरुषांचे वजन ९०.३ किलो व स्त्रियांचे ७६.७किलो असावे.
१३)४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांचे वजन
४० ते ४९ वर्षांच्या वयात प्रत्येक पुरुषाचे वजन किमान ९०.९ किलो व स्त्रियांसाठी ७६.२ किलो असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ५० ते ६० वर्षे वयाच्या पुरुषांचे वजन ९०.३ किलो व स्त्रियांचे ७७ किलो असणे आवश्यक आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.