आरोग्यनामा ऑनलाईन- योग्य आहार आणि योगासन करून तुम्ही वजन कमी करू शकता. योगासन शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्याचा सर्वात परिणामकारक उपाय आहे. यामुळे वजन कमी होते, सोबतच शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो, ज्यामुळे त्यांच्या कामकाजात सुधारणा होते. आम्ही तुम्हाला काही योगासन सांगणार आहोत ज्यांचा सराव केल्याने लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो…
ही योगासन करा
1 जानुशीर्षासन
जीम आणि डाएटने सुद्धा वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जानुशीर्षासनाद्वारे सुद्धा आपले पोट कमी करू शकता.
2 अर्ध मत्स्येंद्रासन
हे योगासन केल्यान पचनशक्ती सुधारते. लीव्हर आणि पाचक ग्रंथीसंबंधी समस्या दूर होतात.
3 सिद्धासन
सिद्धासन एक प्रचलित योगासन आहे, जे प्राचीन काळापासून तप अभ्यास म्हणून सुद्धा केले जाते. हे योगासन केल्याने शरीरात लवचिकपणा येतो.
4 गरुडासन
हे योगासन केल्याने शरीरात रक्तस्त्राव वाढतो, जो सेक्सदरम्यान इरेक्शनमध्ये मदत करतो.
5 पवनमुक्तासन
हे योगासन शरीरात जमा झालेला अनावश्यक गॅस बाहेर काढण्यासाठी केले जाते. हे आसन केल्याने पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता असल्यास तिच्यापासून सुटका मिळते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.