आरोग्यनामा ऑनलाइन : लठ्ठपणामुळे अनेक आजार जन्म घेतात. जर तुम्हाला वजन कसे कमी करावे हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आम्ही तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय सांगणार आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्याचे हे उपाय असे आहेत, ज्यांच्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. हे उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
1 घाई-गडबड टाळा
सकाळी उठल्या-उठल्या घाई-गडबड करणे टाळा. यामुळे तणाव येतो. यामुळे हार्मोन कोर्टिसोल वाढल्याने वजन वाढते. यासाठी सकाळची दिनचर्या शांतते पार पाडण्याचा प्रयत्न करा.
2 हलका व्यायाम करा
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम हलका व्यायाम करा. यामध्ये काही रेसिस्टेंट ट्रेनिंगचा समावेश केल्यास पोटाची चरबी कमी होते.
3 प्रोटीन आणि फायबरयुक्त ब्रेकफास्ट
संशोधन सांगते की, जास्त प्रोटीन सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते. याशिवाय फायबरचे सेवन केल्या पोटाची चरबी कमी होते. सूर्यफुलाचे बी, ब्रोकोली, एवोकाडो, इत्यादीचा जेवणात समावेश करा.
4 ज्यूस ऐवजी पाणी प्या
नाश्त्यात ज्यूस पिणे चांगले नाही. यामुळे चरबी वाढते. त्याऐवजी पाणी पिण्याची आवश्यकता पूर्ण करा.
5 ग्रीन टी प्या
दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये अँटीऑक्सिडेंट एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट (ईजीसीजी) दोन्ही असते. ईजीसीजी पोटाची चरबी कमी करण्यात मदत करते.
6 दुपारचे जेवण पॅक करा
यामुळे जेवण योग्य प्रमाणात सेवन केले जाते. मर्यादित जेवण खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
7 पूर्ण झोप घ्या
संशोधन सांगते की, पूर्ण झोप न घेतल्याने वजन वाढते. रोज किमान आठ तास झोप घ्या. यामुळे मेंदू शांत राहतो, पचनक्रिया चांगली होते.
8 कामाच्या ठिकाणापर्यंत पायी किंवा सायकलने जा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डियो एक्सरसाइज चांगली मानली जाते. यामुळे बस किंवा कारऐवजी कामाच्या ठिकाणी सायकल किंवा चालत जाण्याचा पर्याय निवडू शकता.