आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करायचे असते तेव्हा योग्य आहार आणि नियमित व्यायाम महत्वाची भूमिका निभावतात. व्यस्त दिनचर्यामुळे अनेकांना व्यायाम करणे कठीण असते. परंतू काही उपाय करून आपण वजन कमी करू शकता.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
१) पॉर्शन कंट्रोल
लठ्ठपणा वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे जास्त खाणे. कधीकधी आपले पोट भरलेले असते तरी आपण अजूनही आवडते पदार्थ खाणे निवडतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या सवयी वजन वाढण्यास कारणीभूत आहेत. वजन कमी करायचे असेल तर याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त खाण्याऐवजी आपण कमी प्रमाणात खावे.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
२) भूक नियंत्रित करा
जेव्हा आपल्याला कोणत्याही वेळी भूक लागते तेव्हा काहीतरी खाणे हाच एक पर्याय असतो.अचानक लागणारी भूक नियंत्रित करणे महत्वाचे आहे. आपण पाणी पिऊ शकता किंवा काही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
३) फायबर समृद्ध अन्न खा
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण जंकफूड खाण्यापेक्षा फायबर समृध्द अन्न खावे. फायबर समृद्ध असलेले अन्न आपल्याला केवळ पाचन तंत्र मजबूत करत नाहीत तर आपले पोट बराच काळ भरलेले ठेवते.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
४) भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी प्या आणि आपल्याला हायड्रेटेड ठेवा. हे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्याला ऊर्जावान आणि ताजे ठेवू शकते.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
५) आहारात प्रथिने समाविष्ट करा
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या कार्ब, चरबी आणि प्रथिने कमी करण्यास विश्वास ठेवतात. तज्ज्ञांच्या मते आपल्या आहारात वेगवेगळ्या पोषक द्रवांचे मिश्रण असले पाहिजे. विशेषतः प्रथिनेयुक्त अन्न आपल्याला अतिरिक्त कॅलरी बर्न करण्याची ऊर्जा देते.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
६) आवश्यक झोप घ्या
वजन कमी करण्यासाठी झोप ही अतिशय फायदेशीर आहे.आवश्यक झोप घेणे हे आपले तणाव हार्मोन्स मॅनेज करून वेळोवेळी भूक कमी करते. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप येत नाही तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल तयार करते जे तणाव संबंधित हार्मोन आहे. हे आपल्या शरीरावर चरबी वाढवण्यास मदत करते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या