आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Weight loss | लठ्ठपणा वाढणे आपले व्यक्तिमत्त्व खराब दिसते. आपला आत्मविश्वास कमी होतो. आज अनेक लोक पोटातील चरबी वाढल्यामुळे आणि वजन (Weight loss) वाढल्यामुळे चिंतेत आहे. जर आपल्याला देखील ही समस्या असेल आणि कठोर परिश्रम करूनही आपले वजन कमी होत नसेल तर आपल्या आहारात समाविष्ट करा ही पाच फळे.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
१) टरबूज
टरबुजाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.टरबूजामध्ये ९० टक्के पाणी असते, जे आपले शरीर आणि आपल्या त्वचेला हायड्रेट करून आपले वजन कमी करण्यास मदत करते.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
२) अननस
ओटीपोटातील अतिरिक्त चरबी आणि वजन वाढवण्यापासून मुक्त होण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करा. अननसामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पोट बर्याच काळासाठी भरलेले राहते.दिवसातून अनेक वेळा अननस खा यामुळे तुमचे वजन वाढणार नाही, कारण त्यात कॅलरी कमी असते.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
३) स्ट्रॉबेरी
पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक कप स्ट्रॉबेरी खूप फायदेशीर ठरू शकते. मधुर लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. हे सेवन केल्याने पचनच नव्हे तर टाइप २ मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीचे सेवन करून आपण आपले वाढलेले वजन आणि पोटाची चरबी अगदी सहजपणे कमी करू शकते.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत
४) सफरचंद
सफरचंदाचे नाव हे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फळांमध्ये प्रथम घेतले जाते. सफरचंदांमध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. जे पाचक प्रणाली सुधारण्याबरोबरच आपले वाढते वजन देखील कमी करू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या
५) संत्री
संत्री हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. संत्रीमध्ये असलेले कमी कॅलरी आणि अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
याव्यतिरिक्त, नियमित सेवन केल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !