आरोग्यनामा ऑनलाइन – कर्करोगाचे निदान करण्यासाठी वैज्ञानिकांनी नवीन डिवाइस तयार केला असून हे यंत्र थेट रुग्णाच्या रक्तातून कॅन्सर सेल्स एकत्र करू शकतं. याने कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी बायॉप्सी करण्याची गरज भासणार नाही. या डिवाइसमुळे काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचं स्क्रीनिंग करून त्यातील कॅन्सरच्या सेल्सची माहिती मिळू शकते.
हे डिवाइस काही तासांमध्येच नसांमधील कॅन्सरचे सेल्स पकडतं. जास्तीत जास्त रक्ताची तपासणी याद्वारे केली जाते. ज्याप्रमाणे सुरक्षेसाठी दरवाज्यावर कॅमेरा लावल्यास आणि दर पाच मिनिटाला फोटो घेतले तर चारीला आळा बसू शकतो. पण, ५ मिनिटांदरम्यान चोर आला तर त्याला कॅमेरा पकडू शकणार नाही. परंतु, व्हिडीओ कॅमेरा लावल्यास सलग चित्रिकरण होते आणि प्रत्येक वेळचे चित्र मिळू शकते याचप्रमाणे हे डिवाइस तयार करण्यात आले आहे.
ट्यूमर्स रक्तात एका मिनिटात साधारण एक हजार कॅन्सर सेल्स रिलीज करू शकतो. कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी सध्या वर्तमानातील पद्धत रूग्णांसाठी एका सॅम्पलवर आधारित आहे. एकदा साधारण एक चमचा सॅम्पल घेतलं जाऊ शकतं. एका सॅम्पलमध्ये साधारण १० कॅन्सर सेल्स असतात. अनेकदा कॅन्सरची अॅडव्हान्स टेस्ट असूनही सॅम्पलमध्ये एकही कॅन्सरचा सेल सापडत नाही.