आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहारात नियमित डाळींचे सेवन करणे, हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. परंतु, आपण दिवसाच्या दृष्टीकोनातून विचार करून आहार घेतल्यास आणखी फायदे होऊ शकतात. यामुळे आरोग्यासह बौद्धक क्षमता आणि आर्थिकबाबतीतही चांगला परिणाम दिसून येतो, असे पुराणामध्ये म्हटले आहे.
या दिवशी खा ही डाळ
रविवार
ब्रह्मवर्त पुराणानुसार रविवारी मसुर डाळ, आले आणि लाल रंगाची रस्सा भाजी खाऊ नये. मात्र, रविवारी चनाडाळ आणि मुगडाळ खाणे शुभ असते.
सोमवार
विना सालवाली उडीद डाळ अथवा तुरडाळ सोमवारी खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
मंगळवार
मसूरची डाळ मंगळवारी खाणे शुभ परिणाम वाढविण्यासाठी उपयोगी आहे.
बुधवार
मुगडाळ अथवा सालवाली मुगडाळ बुधवारी खाणे आरोग्य, बुद्धी आणि आर्थिक फायद्यासाठी लाभदायक आहे.
गुरुवार
चनाडाळ गुरुवारी खाणे गुरूचे शुभफळ मिळण्यासाठी लाभदायक आहे.
शुक्रवार
मुगडाळ आणि कुळीथडाळचे सेवन शुक्रवारी करणे खुप लाभदायक आहे. शुक्रवारी चनाडाळीचे सेवन करणे शुभ मानले जात नाही.
शनिवार
काळी उडीदडाळ, मटार आणि मसूरडाळ शनिवारी खाणे लाभदायक आहे.