अकाली वृद्धत्व येऊ शकते
जेवण केल्यानंतर लगेच स्नान करत असल्यास कफ वाढतो. जेवण केल्यानंतर लगेच चालणे, पळणे, शेकणे या क्रिया केल्यास शरीरातील वात रोग वाढतात. या रोगांमुळे शरीर कमजोर होते आणि वृद्धावस्था लवकर येते. या रोगांपासून कसे दूर राहावे ज्यामुळे अकाली वृद्धावास्थेला सामोरे जावे लागणार नाही.
कफ का वाढतो
जेवण केल्यानंतर लगेच स्नान करण्याची सवय असल्यास कफ वाढतो. तसेच तहान लागली नसेल तरी पाणी पिणे, शिळे अन्न खाणे, शरीरावर तिळाच्या तेलाने मालिश करणे, खूप पिकलेले केळ खाणे, रात्री झोपण्यापूर्वी दह्याचे सेवन करणे, पावसात जास्त भिजणे, जास्त प्रमाणात मुळा खाणे यामुळे कफामध्ये वृद्धी होते. कफामुळे पुरुष शक्ती कमी होते आणि व्यक्ती लवकर वृद्ध होतो. यामुळे या सवयी टाळाव्यात
पित्त का वाढते
वेळेवर संतुलित आहार न घेणे, दुषित अन्न खाणे, यामुहे पित्त प्रकोप वाढतो. यासाठी खान-पानाच्या वेळा सांभाळाव्यात.
वात का वाढतो
जेवण केल्यानंतर लगेच चालणे, पळणे, शेक घेणे, यामुळे वात वाढतो. वात टाळण्यासाठी जेवण केल्यानंतर लगेच थोडावेळ वज्रासनामध्ये बसावे. हे आसन केल्याने वात रोग होत नाहीत. नेहमी दुःखी राहणे. सदैव चिंतेत राहणे. जास्त उपवास करणे. जास्त प्रमाणात घाबरलेल्या अवस्थेत जीवन व्यतीत करणे, या कामांमुळे वात म्हणजे वायू रोगांची उत्पत्ती होते. तीन प्रकारचे वात रोग सांगण्यात आले आहेत. पहिला शारीरिक क्लेशामुळे उत्पन्न होणारा वात रोग. दुसरा मानसिक संतापामुळे उत्पन्न होणारा वात रोग तर तिसरा कामजनित वात रोग होय.
…तर वृद्धावस्था राहील दूर
डोळे नेहमी स्वच्छ पाण्याने धुवा, दररोज थोडासा व्यायाम करा, वेळोवेळी पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश करा, वेळोवेळी दोन्ही कानांमध्ये तेल टाका, भूक लागल्यानंतरच जेवण करा, जेवण केल्यानंतर पान खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, नियम-संयमाने जीवन व्यतीत करा, ही काळजी घेतल्यास वृद्धावस्था दूर राहते.