आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तोंडाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. काहीवेळा विशिष्ट पदार्थ खाल्याने अथवा तोंड कोरडे पडल्याने तोंडाला दुर्गंधी येते. अशावेळी पाण्याने चुळ भरणे हा तात्पुरता इलाज करू शकता. पण, कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. हे उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
१ वेलची
वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून करा. दुर्गंधी चटकन नाहीशी होते.
२ दालचिनी
दालचिनीमध्ये जंतूनाशक घटक आहेत. ती चघळल्यास दुर्गंध कमी होतो.
३ लवंग
लवंग चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
४ बडिशेप
बडिशेप खा. त्यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या किटाणूंचा नाश होतो.
५ पुदिना
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी पुदिन्याची ३-४ पाने खावीत.
Visit : arogyanama.com