आरोग्य नाम ऑनलाइन टीम –
आरोग्य चांगले रहावे, तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात. यासाठी आहार आणि व्यायामाचे नियोजन करतात. काहीजण आहार कमी करतात. परंतु, अवेळी भूक लागत असल्याने वजन कमी करणारापुढे मोठा पेच निर्माण होतो. यासाठी भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात करणे गरजेचे असते. हे कसे करावे, ते जाणून घेवूयात.
असा घ्या आहार
१ च्युईंगम चघळा
च्युईंग गम चघळल्याने भूक कमी होते. मात्र च्युईंगगम शुगर फ्री असावे.
२ आरोग्यदायी फॅट्सचा आहार
आरोग्यदायी फॅट असलेले बदाम, अॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईलचे सेवन करावे.
३ फायबर्सयुक्त आहार
आहारात हिरव्या भाज्या, फळे घ्यावीत. यातून फायबर्स आणि कॅलरीज मिळतात.
४ प्रोटीन्सयुक्त आहार
अख्या डाळी, मासे, अंडी, असा प्रोटीन्सयुक्त आहार वाढवावा. यामुहेभूक नियमित होते.