आरोग्यनामा ऑनलाईन टीम- वैक्सिंगमुळे त्वचा क्लीन आणि मऊ होते. पण प्रत्येकालाच अशी सुंदर आणि मऊ त्वचा लाभतेच असे नाही. कारण वैक्सिंग मुले काहींना सूज, पुरळ तर खाज सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. वैक्सिंगनंन्तर या समस्यांना उपाय म्हणजे लगेचच तेल किंवा लोशन न लावणे. कारण यामुळे त्रास जास्त वाढू शकतो तसेच त्वचा काळी पडू शकते.
तसेच ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांच्या वैक्सिंगच्या वेळेस रक्तस्राव होतो तेव्हा त्यांनी बर्फाचा तुकडा त्वचेवर घासावा. जेणेकरून सच्छिद्र बंद होऊन रक्त येणे थांबेल. वॅक्स मध्ये मेन असल्यामुळे त्याला सूर्यप्रकाशाचा धोका असतो म्हणून सनबर्न पासून वाचण्यासाठी शक्यतो उन्हात बाहेर पडू नये. तसेच ऑईली क्रीम्स वापरू नये. वॅक्स केल्यांनतर एलोवेरा जेल चा वापर करणे.
जर तुम्ही नियमित स्विमिंगला जात असाल तर काही दिवस टाळावे. तसेच ज्या भागावर वॅक्सिन्ग केलेली आहे त्यावर घट्ट कपडे वापरू नये. सुगंधी उत्पादने वापरू नये जसे कि, बॉडीलोशन, बॉडीस्प्रे . जर त्वचेवर सूज आली तर कार्टिसोन क्रीम अप्लाय करावी. या बाबींवर लक्ष दिल्यास पुरळ नक्कीच येणार नाही व तुम्ही त्रासापासून वाचाल.