त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्यायावर विविध थेरपी करत असतात. शिवाय, चेहऱ्यावर लोशन, क्रिम, पावडरचा थर जमा होतो. याचे साइड इफेक्ट होऊ शकतात. परंतु, आता महिला वॉटर थेरपीला पसंती देत असल्याचे दिसते. या थेरपीमुळे त्वचा उजळते आणि फ्रेश होते. कधीकधी विविध प्रकारचे प्रॉडक्टस् वापरल्यामुळे त्रास होतो. त्वचा टॅनिंग म्हणजे काळवंडणे आणि डिहायड्रेशनची समस्या होते. म्हणूनच वॉटर थेरपी नैसर्गिक आणि जास्त उपयुक्त आहे. या थेरपीमुळे स्रायू बळकट होतात तसेच त्वचादेखील चांगली होते. फुफ्फुसे आणि हृदयसुद्धा निरोगी राहते. रोज मात्रांमध्ये एक ग्लास पाणी पिल्यास शरीरातील एनर्जीची पातळी वाढून त्वचा फ्रेश दिसते. दूसरी एक वॉटर थेरपी म्हणजे त्वचा ग्लो करण्यासाठी पाणी आणि कोरफड मिसळून मसाज करावा. यानंतर गॅल्वेनिक मशीनने दोन मिनिटांपर्यंत मसाज करावा. यामुळे त्वचा लवचिक आणि मुलायम होते. तसेच पाण्यात व्यायाम करणे फार उपयुक्त असते. यामुळे तणाव नाहीसा होतो. शरीरातील तापमान वाढते आणि त्यामुळे जास्त घाम येत नाही. या व्यतिरीक्त पाण्यातील हायड्रोस्टेटीक इफेक्टमुळे मसाज केल्यासारखे वाटते. याशिवाय इतर काही उपाय आहेत. यामध्ये अ‍ॅपल विनेगर वापरता येते. हे चवीला फारसे चांगले नसते, पण वजन कमी करण्यासाठी खुपच लाभदायक आहे. तब्बेतदेखील चांगली रहते.

अ‍ॅप्पल विनेगर ज्युस दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावा. एक चमचा अ‍ॅप्पल साइडर विनेगरला एक कप पाण्यात मिसळवून पिल्याने वजन कमी होते. तसेच व्हेजिटेबल ज्युससुद्धा लाभदायक असतो. ताज्या भाज्यांचे रस शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. यामुळे शरीराला गरजेचे असणारे सगळे पोषक तत्त्व सोप्या पद्धतीने मिळतात. यामुळे वजन पण कमी होते. व्हेजिटेबल ज्युसमध्ये तंतू अधिक प्रमाणात असल्याने लवकर भूक लागत नाही. जेवणाआधी २० मिनिटे आधी हो ज्युस पिल्यास तुम्हाला कमी जेवणातच पूर्ण पोट भरल्यासारखे वाटेल. यामुळे वजन कमी होऊ शकते. तसेच ग्रीन टी पिल्यास ३५-४३ फॅट कमी होते. वजन कमी करण्यासाठी दिवसातून ३ ते ५ कप ग्रीन टी प्यावा. यामध्ये दूध मिसळण्याची गरज नाही.

आणखी एक उपाय म्हणजे मॉडर्न डिटॉक्सीफिकेशन होय. यामुळे त्वचा ग्लो करते. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. अतिरीक्त ऑइल पण स्वच्छ होऊन जाते. कोरड्या त्वचेला मॉश्चराइज करण्यासाठी या दिवसात सुपर हायड्रेटचा वापर केला जात आहे. पाण्याने चेहऱ्यायावर दबाव टाकून त्वचेला पाणी देण्यात येते. तीन ते चार सेटिंगने त्वचा सॉफ्ट होते. वाढत्या वयात तणावाला दूर ठेवण्यासाठी एक्वा रेडीयन आवश्यक आहे. जेट स्प्रेच्या साहाय्याने सुपर हायस्पीडपासून याचा उपयोग केला जातो. ही एक तासाची प्रोसेस असते. अनेक महिलांना ही पद्धत आवडते. तसेच स्टिम सोना बाथ केल्यासही फायदा होतो. तणावामुळे अस्वस्थता वाटत असल्यस हॉट शॉवर आणि सोनामध्ये बाथ घ्यावी. तसेच ज्युस पिऊन वजन कमी करता येऊ शकते. नारळ पाणीमध्ये जास्त इलेक्ट्रोलाइटस् असतात. यामध्ये अतिरिक्त शुगरची मात्रा नसते. अजिबात कॅलरी नसल्याने वजन वाढत नाही.