आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अति स्वच्छतेच्या वेडापायी आणि पूर्ण माहिती नसल्याने अनेकजण सतत हात धूत असतात. ही सवय आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. जेवणाआधी, जेवणानंतर, टॉयलेटवरून आल्यानंतर, बाहेरून घरात आल्यानंतर, अशावेळी हात धुणे योग्य आहे. पण, विनाकारण सतत हात धुणे धोकादायक असते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त वेळा हात धुण्याच्या सवयीमुळेही तुम्ही आजारी पडू शकता, असे युएसच्या डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन सेंटरने म्हटले आहे.
हे लक्षात ठेवा
1 त्वचेवर दोनप्रकारचे बॅक्टेरिया असतात. एक आपल्याला आजारी करतात आणि दुसरे आजारांपासून आपला बचाव करतात.
2 हात धुतल्याने खराब बॅक्टेरिया निघून जातात. पण हेल्दी बॅक्टेरिया त्वचेवरच राहतात. पण पुन्हा पुन्हा हात धुतल्याने या हेल्दी बॅक्टेरियांचे नुकसान होते.
3 सतत हात धुतल्याने त्वचेवरील हेल्दी ऑइल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते.
4 त्वचा कोरडी झाल्याने यावर असलेले हेल्दी बॅक्टेरियाही निघून जातात.
5 हातावर पुन्हा पुन्हा सॅनिटायझरचा वापर केल्यानेही आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. सॅनिटायझरचा सतत वापर करणारे लवकर आजारी पडतात.
6 निरोगी राहण्यासाठी हात स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. पण ते योग्यवेळी स्वच्छ केले पाहिजेत.
7 टॉयलेटमधून आल्यावर, जेवण करण्याआधी किंवा जमिनीवर पडलेली एखादी वस्तू उचलली तर केवळ सॅनिटायझरचा वापर करु शकता.