आरोग्यनामा ऑनलाईन- प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं. यासाठी अनेक लोक हे चेहऱ्यावर महागड्या क्रीम्सचा वापर करत असतात. परंतु याचे अनेक साईड इफेक्टही होतात. जर चेहऱ्याचं तेज वाढवायचं असेल तर फक्त थंड पाण्याचा(washing face) उपयोग करावा. आज आपण, रोज सकाळी थंड पाण्याचे चेहरा धुतला(washing face) तर कोणते फायदे होतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
– सकाळी उठल्यावर थंड पाण्यानं चेहरा धुवा. यावेळी साबण किंवा फेसवॉशचा वापर करू नका. थंड पाण्यानं स्वच्छ करून घ्या. रोज हा प्रयोग केला तर काही दिवसातच फरक दिसून येईल.
– काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर तेज जाणवू लागेल. कारण सकाळी सकाळी थंड पाण्यानं चेहरा धुतला तर त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. महत्त्वाचं म्हणजे त्वचा जास्त तरूण राहते.
– रोज थंड पाण्यानं चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
– यामुळं त्वचाही तजेलदार होते आणि त्यामुळं रक्तप्रवाह तीव्र होतो आणि चेहऱ्यावर चकाकी येते.
– सन बर्नचा त्रास होत असेल तर रोज सकाळी थंड पाण्यानं चेहरा धुवावा. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून हे करावं. असं केल्यास सुर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल. सोबतच आपल्या चेहऱ्यावर टवटवीतपणा येतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.