आरोग्यनामा ऑनलाईन – वेळ वाचवण्यासाठी आणि भूख शांत करण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे अन्न गरम करून खात असाल तर तुमची ही सवय तोबडतोब बंद करा. ही सवय आरोग्याचे नकळत मोठे नुकसान करू शकते. फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा गरम खाण्यासाठी सर्वच पदार्थ योग्य नसतात. काही पदार्थ असे केल्याने अनेक धोके निर्माण करू शकतात. कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नयेत ते जाणून घेवूयात…
भारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी? जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान
चिकन –
शिळे चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यामधील प्रोटीन नष्ट होतात. पचनाशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
अंडे –
अंडे दुसर्यांदा उच्च तापमानावर गरम केल्याने विषारी होते. विशेष करून उकडलेले अंडे पुन्हा गरम करून खाऊ नये. यामुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. कॅन्सरसारखा घातक रोग सुद्धा होऊ शकतो.
Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत
भात –
फूड्स स्टँडर्ड्स एजन्सी (एफएसए) नुसार, शिळा भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने व्यक्ती फूड पॉयजनिंगने पीडित होऊ शकतो. भातात बॅसिलस सेरेस नावाचे अत्यधिक प्रतिरोधक बॅक्टेरिया असतात. तांदूळ शिजवताना ते नष्ट होतात, परंतु भात थंड झाल्यानंतर ते पुन्हा वाढतात. अशावेळी पुन्हा गरम केल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.
बटाट्याची भाजी –
बटाट्याची भाजी सतत गरम केल्याने यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे पचनशक्ती बिघडते.
मशरूम –
मशरूम बनवल्यानंतर तोबडतोब खावेत दुसर्या दिवसासाठी ठेवू नये. हे पुन्हा गरम केल्यावर यात विषारी पदार्थ तयार होतात. पचनशक्ती बिघडते.
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
पालक –
यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते, हे पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास नायट्राईट हे नायट्रोजमीन्स मध्ये बदलते, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.
बीट –
बीट सुद्धा पुन्हा गरम केल्यास यातील नायट्रेट नष्ट होऊ लागते.
टीप :
वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
कशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या