आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीरापेक्षा पोटाचा घेर वाढल्याने व्यक्तीमत्वाची छाप पडत नाही. शरीर बेढभ दिसते. काही चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अनेकांना सतावत असल्याचे दिसते. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. परंतु, काही खास घरगुती उपाय केल्यास वाढलेले पोट कमी होऊ शकते. व्यायामासाठी वेळ मिळत नसल्यास हे उपाय जरूर करावेत. या उपायांची माहिती आपण घेणार आहोत.
हे आहेत उपाय
१ उपाशी राहील्याने मेटाबॉलिज्ममध्ये बिघाड होतो आणि शरीर पोटाच्या चौबाजूने फॅट जमा होते. यासाठी दर दोन तासांनी काही तरी खा.
२ हसल्याने पोटाच्या मसल्स संकुचित होतात. त्यामुळे सतत हसत राहा.
३ दिवसभरात २ लीटर पाणी प्या. यामुळे वजन नियंत्रित राहते. पोट वाढण्याची समस्या सुद्धा दूर होते.
४ सिट-अप्स फॅट कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.
Visit : arogyanama.com