आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकजण वाढलेलं वजन आणि पोटाची चरबी कमी(lose weight) यामुळं त्रस्त असतात. अनेकांना या पासून सुटका हवी असते. बाजारात यासाठी अनेक उत्पादन उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा त्यांचा फायदा होत नाही. याउलट काही उत्पादनांचे दुष्परिणामही दिसून येतात. तुम्हालाही पोटाचा घेर आणि वजन कमी(lose weight) करायचं असेल तर यासाठी आज आपण काही घरगुती ड्रिंक्स जाणून घेणार आहोत. परंतु त्यांचं सवन तुम्हाला सकाळी उपाशीपोटी करावं लागणार आहे.
1) जिऱ्याचं पेय – जिरं हे एक वेटलॉस फूड आहे. पाण्यात जिरं टाकून त्याचं सेवन केलं तर फायदा मिळू शकतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी याची मदत होऊ शकते. कारण यात नॅचरल प्लांट केमिकल फायटोस्टेरॉल्स असतं. यामुळं बॅड कोलेस्ट्रॉल दूर होतात. यामुळं ट्रायग्लिसराईड्सचं विघटन होण्यासही मदत होते. यामुळं शरीरातील चरबीचं प्रमाण कमी होतं. जिऱ्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारते. याचं ड्रिंक तयार करण्यासाठी एक चमचा जिरं आणि एक ग्लास पाणी रात्रभर भिजत ठेवावं. यानंतर सकाळी हे पाणी व्यवस्थित गाळून प्यावं.
2) धन्याच्या बियांचं पाणी – धन्याच्या बियांमधील गुणांमुळं वजन कमी होण्यास फायदा होतो. धन्यात मिनरल्स पोटॅशियम, आयर्न, मॅग्नीज, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, क, आणि सी असे व्हिटॅमिन्स असतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक चमचा धन्याच्या बिया पाण्यात टाकून उकळून घ्या. हे मिश्रण रात्रभर भिजू द्या. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हे पेय प्यावं. यामुळं शरीरातील चरबी आणि अतिरीक्त वजन कमी होण्यास मदत होईल.
3) बडीशेप – शरीराचं मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी बडीशेपचा उपयोग होतो. त्यामुळं वजन घटवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. लठ्ठपणा कमी करून शरीरयष्टी सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. बडीशेपच्या बियांचं सेवन केलं तर भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहतं. एक किंवा दोन चमचे बडीशेपला एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी याचं सेवन करावं.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.