आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मसाल्यात वापरले जाणारे काळे जिरे (कलौंजी) अनेक आजरांवर गुणकारी आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने यांसारख्या १०० पेक्षा अधिक पौष्टिक घटक असतात. जे शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. जाणून घ्या काळ्या जिऱ्याचे औषधी उपयोग –
कॅन्सर
एक ग्लास द्राक्षाच्या रसामध्ये एक चमचा काळ्या जि-याचं तेल मिसळून घेतल्याने कॅन्सरच्या पेशी कमी होऊ लागतात.
डायबेटीज
डायबेटीजच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काळेजिरे डायबेटीजवर गुणकारी आहे. जर तुम्हाला डायबेटीज असेल तर काळेजिरे , मोहरी आणि डाळिंबाच्या बिया बारीक करून मिक्स करून रिकाम्या पोटी करून घ्या.
रक्तातील साखरेची पातळी यांची नियंत्रित ठेवते
काळ्या जिऱ्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे डायबेटीज सारख्या रोगापासून बचाव होण्यास मदत होते.
किडनीस्टोन
किडनीस्टोनच्या रुग्णांनी काळेजिरे बारीक करून मधासोबत घ्या. किडनीस्टोनपासून लवकर सुटका मिळेल.