‘या’ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अ‍ॅसिडीटी होईल ‘गायब’

gas

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : सध्या रोजच्या जीवनात कामामागे पळून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अनेकदा आपण जेवणाकडे दुर्लक्ष करतो. वेळेवर जेवण नाही होत, त्यात योग्य आहार घेतला नाही जात. बाहेरिल तेलकट पदार्थ अधिक खाण्यात येतात. त्यामुळे सामान्याने पोटाशी निगडीत समस्यांना सुरुवात होते. त्यातल्या त्यात अ‍ॅसिडिटी हा अधिकाधिक लोकांना होणारा त्रास आहे.

ही अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी अनेकदा आपण वेगवेगळ्या पेयांचा वापर करतो किंवा औषधे घेतात. पण अधिक लोक असेही आहेत ज्यांना औषधे घेतल्यानंतर अ‍ॅसिडिटी कमी होण्याएवजी अधिक होते, किंवा त्याचा त्रास होतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटीला पळवण्याठी अधिकची औषधे घेण्याचीही गरज नाही, त्यासाठी घरातील पदार्थांचा वापर करू शकता. ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही होतं.

तुळशीची पाने :

तुळस ही सर्वांच्याच घरात पुजली. तुळशीचे अनेक उपयोग आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँट-अल्सर गुणधर्म असतात. ज्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. तसंच तुळस ही पचनासाठी खूप मदत करते. तसंच पोटाची पचन क्षमताही तुळस वाढवते. तुळस एवढी गुणकरी की त्याचा साईड इफेक्टही होत नाहीत.

बडिशेप :

आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो तर तिथं आपल्याला जेवणानंतर बडिशेप दिली जाते. बडिशेपमध्ये अ‍ॅसिडिटीला ठीक कऱण्याचे गुण आहे. तसंच बडिशेप गॅसच्या समस्येवरही रामबाण उपाय आहे. तर पचन क्रियाही चांगली ठेवते. त्यासोबतच पोट दुखत असेल किंवा पोटासंबंधातील कोणत्याही समस्येवर बडिशेप उपयोगी काम करते.

थंड दूध :

थंड दूध हे अतिशय गुणकारी आहे. त्यात शरिरातील पीएच कंट्रोल करण्याचे गुण असते. ज्याने पोटातील जळजळ कमी होती. तसंच थंड दूध अ‍ॅसिडिटीची त्रासही दूर करते. तसंच दूध हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे. ज्याने पोटातील अॅसिडिटी होण्याआधीच रोकता येते. त्यासाठी अ‍ॅसिडिटी हो न हो गरम दूध पिण्याएवजी थंड दूध कधीही फायदेशीर ठरते.