आरोग्यानामा ऑनलाईन टीम : नवीन संशोधनानुसार चहामध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सीडंट्स असल्याने हृदयरोग, कर्करोगाशी सामना करण्यासाठी मदत होते. अकाली वृद्धत्त्वापासूनही बचाव करता येतो. चहामध्ये १५ टक्के अधिक आरोग्यवर्धक घटक असल्याचा दावा हे संशाधन केलेल्या तज्ज्ञांनी केला आहे. आणखी कोणत्या पदार्थांनी दीर्घायुष्य लाभू शकते, याविषयी जाणून घेवूयात.
हे पदार्थ खा
१ रेड वाईन
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अभ्यासानुसार योग्य प्रमाणात रेड वाईन पिणाऱ्या लोकांना हृदयरोगाचा धोका कमी असल्याचे दिसून आले.
२ लवकर झोपा
झोप कमी झाल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. शांत झोपेमध्ये झालेली थोडीशी वृद्धीसुद्धा आरोग्यवर्धक ठरू शकते. यासाठी रात्री लवकर झोपा.
३ काजू-बदाम
दररोज काजू-बदामासारखा सुकामेवा खाल्ल्याने अकाली मृत्यूचे प्रमाण इतरांपेक्षा २० टक्क्यांनी कमी असते. हृदयरोग, कर्करोग आणि श्वसनासंबंधी विकार यामुळे कमी होतात.
४ व्हेज जेवण
हॉर्वर्ड विद्यापिठातील संशोधनानुसार शाकाहार, भाज्या, फळे, कठिण कवचाची फळे खाण्यामध्ये असल्यास आरोग्य चांगले राहाते.
५ मित्रांचा सहवास
कुटुंब, मित्रांच्या संपर्कात राहिल्यास ताण कमी होतो. ऑक्सीटोसिन, डोपामाईनसारखी आनंद देणारी संप्रेरके यामुळे अधिक स्रवतात.
६ जेवताना यावेळी थांबा
जपानमधील ओकीनावा बेटावरील लोकांचे आयुष्यमान १०० वर्षांपर्यंत आहे कारण ते लोक ८० टक्के पोट भरले की जेवण थांबवतात.
७ एकतरी गाणे म्हणा
नियमित गाणे म्हणणं हे आयुष्यवर्धक आहे. गाण्यामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते.
८ शरीरसंबंध
महिन्याभरात एखादेवेळेस शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यांचे आयुष्यमान कमी असते असे सर्वेक्षणावरुन सिद्ध झाले आहे.
Visit : arogyanama.com