आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच प्रत्येकजण स्लीव्हलेस ड्रेस घालण्यास सुरुवात करतात. परंतु काहीवेळा मुलींना ते घालण्यास लाज वाटते. त्याचे कारण आहे अंडरआर्मचा काळेपणा. सतत क्रीम आणि शेविग केल्यामुळे हाताखालील भाग अधिक काळा होत जातो. अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता….
गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या
१) बटाटा-
व्हिटॅमिन ए, बी आणि सी समृद्ध बटाटे आपल्या संवेदनशील त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक ब्लीचिंग आहे. आपण अंडरआर्मला बटाट्याचा रस लावू शकता. यासाठी रस लावा आणि १५-२० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. आपण बटाट्याऐवजी लिंबू देखील वापरू शकता. लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात जे त्वचेला खोलवर हायड्रेट करतात तसेच अंडरआर्मचा काळेपणा दूर करतात
शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल
२) लिंबू –
लिंबाचे तुकडे कापून ते प्रभावित भागावर किंवा लिंबाच्या रसात कापूस बुडवून त्वचेवर घासून घ्या. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. उरलेल्या अर्ध्या तुकड्यावर थोडीशी साखर मिसळून स्क्रब केल्याने तेथील काळेपणा दूर होतो.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या
३) काकडी-
नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असलेली काकडी गडद अंडरआर्मपासून मुक्त होण्यास देखील उपयुक्त आहेत. यासाठी आपल्याला हवे असल्यास आपण काकडीचे पातळ काप कापून अंडरआर्मवर घासू शकता. काकडीचे तुकडे प्रभावित क्षेत्रावर २० मिनिटे ठेवा आणि त्यांना साध्या पाण्याने धुवा.
४) बेकिंग सोडा-
अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा प्रभावी आहे. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडयामध्ये थोडेसे पाणी मिसळा आणि तयार मिश्रण बाधित भागावर लावा आणि हलके मसाज करा.१५-२० मिनिटांनंतर धुवा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या
विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं