क्रिम्सने नव्हे, व्हिटॅमिन्समुळे स्ट्रेच मार्क्स होतात नाहीसे

आरोग्यनामा ऑनलाइन – गरोदरपणानंतर त्वचेवर आलेल्या स्ट्रेच मार्क्समुळे अनेक महिला त्रस्त असतात. गरोदरपणात वजन वाढते आणि डिलिव्हरीनंतर पुन्हा कमी होते. याच कारणामुळे त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. स्ट्रेच मार्क्समुळे महिलांना काही कपडे परिधान करता येत नाहीत. या उपाय म्हणून काही महिला बाजारातील काही महागड्या क्रीम लावतात.

या क्रीममुळे सुध्दा काही फरक पडत नसल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, काही घरगुती उपाय केल्याने यापासून सुटका होऊ शकते. कारण हे व्रण व्हिटॅमिन वापरून घालवता येऊ शकतात. यावर कोणते उपाय आहेत, त्याची आपण माहिती घेणार आहोत. आहारात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ घ्यावेत. गाजर, फिश, एप्रिकॉट आणि बेल पेपरमध्ये कॅरीटिनच्या रूपात व्हिटॅमिन ए असते.

हे त्वचेच्या रिपेअरिंगसाठी फायदेशीर असते. व्हिटॅमिन के चे सर्व प्रकार स्ट्रेच मार्क्स दूर करण्यास मदत करतात. अनेकांना या बद्दल माहीत नसते. यासाठी आहारात स्प्राउट्स, कोबी, स्प्रिंग ऑनियनचा समावेश करावा. यामुळे स्ट्रेच मार्क्ससह डार्क सर्कल्स देखील दूर होतील. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आहारात घ्यावे. हे त्वचेत कॉलेजन प्रॉडक्शन वाढवत असून नवीन त्वचा तयार करण्यास मदत करते.

लिंबू, आवळा, संत्रे, द्राक्ष, यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन ई ला ब्युटी व्हिटॅमिनही म्हणतात. हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन ई घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डॅमेज स्किन सेल्स रिपेअर होऊन स्ट्रेच मार्क्स जाऊ शकतात. त्वचेवर व्हिटॅमिन ई युक्त बॉडी लोशन लावू शकता. रात्री झोपताना प्रभावित जागेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावता येऊ शकते. या व्यतिरिक्त आहारात एवाकाडो, बदाम, पालक, मोहरीच्या बिया यांचा समावेश करावा.