व्हिटॅमीन ‘ई’ च्या कमतरतेमुळे येऊ शकते ‘अकाली वृद्धत्व’
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदय आणि आरोग्य टीकवण्यासाठी शरीराला विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते. यामध्ये व्हिटॅमीन ई हे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमीन ई ची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास अकाली वृद्धत्व येऊन त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. कमी फॅट असलेला आहार घेण्याची सवय असल्यास शरीरात व्हिटॅमीन ई ची कमतरता होऊ शकते.
व्हिटॅमीन ई ची कमतरता निर्माण झाल्यास फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान थांबवता येत नाही.
यामुळे अकाली वृद्धत्व, मधुमेह, दृष्टिदोष, स्नायू ठिसूळ होणे हे त्रास होऊ शकतात. तसेच शरीर अन्नातील जीवनसत्त्वे योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने तयार होणाऱ्या व्हिटॅमिन ई ला प्राधान्य दिले पाहिजे. कृत्रिम व्हिटॅमिन ई घेण्याचे टाळावे. हा फक्त त्वचेसाठी नाही तर डोळ्यासाठीदेखील पोषक घटक आहे. प्रतिकारशक्ती सक्षम करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. पेशींची हानी रोखणारा हा सर्वात चांगला अँटीऑक्साइड घटक आहे.
तीव्र उन्हामुळे होणारे त्वचेचे आणि केसांचे नुकसान भरून काढण्याचे काम व्हिटॅमीन ई करते. व्हिटॅमीन ईमध्ये एवढे गुण असल्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा व्हिटॅमीन ई वापरले जाते. सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा व्हिटॅमीन ईच्या नैसर्गिक स्रोतांना प्राधान्य दिले पाहिजे. वनस्पती तेल, सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, अंडी, सुकामेवा यांचे जास्त सेवन केले पाहिजे. या पदार्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमीन ई असते. स्वत:च्या मर्जीने व्हिटॅमीन ईचा जास्त डोस घेतल्यास त्वचेवर अनेक दृष्परिणाम दिसतात. जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेतात त्यांनी स्वत:हून व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्सचे सेवन करू नये.
व्हिटॅमीन ई मुळे रोग प्रतिकारशक्ती सक्षम होते. पेशींची हानी रोखणारा हा सर्वात चांगला अँटीऑक्साइड आहे. यामुळे नर्व्हस सिस्टिम आणि स्नायूच्या केंद्रीय प्रणालीचे यामुळे संरक्षण होते. तीव्र उन्हामुळे होणारे त्वचेचे आणि केसांचे नुकसान भरून काढण्याचे काम व्हिटॅमीन ई करते. व्हिटॅमीन ईमध्ये एवढे गुण असल्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा व्हिटॅमीन ई वापरले जाते.