आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आवळा, लिंबू, संत्री यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. शरीरासाठी व्हिटॅमिन सी हे अत्यंत लाभदायक आहे. रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ते फायदेशीर ठरते. याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राहते.
२ सांधे जोडण्याचे काम करणाऱ्या कोलाजेन नामक द्रव्य तयार करते.
३ प्रदूषण, प्रखर सुर्यकिरणांमुळे त्वचेची झालेली हानी भरून काढते.
४ कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासून शरिराचे रक्षण करते.
५ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
६ अनेक आजारांपासून बचाव करते.
७ रक्तवाहिन्यांना मजबूत करण्याचे काम करते.
Visit : arogyanama.com