आरोग्यनामा ऑनलाइन – व्हिटॅमिन सी हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून यामुळे शरीराला विविध फायदे होतात. मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम सी व्हिटॅमिन मिळाले, तर त्यांची तब्येत उत्तम राहू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि संक्रमित होणारे आजार दूर राहतात.
हे लक्षात ठेवा
१ संसर्गजन्य आजार वातावरण दमट असताना जास्त पसरतात. अशावेळी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते.
२ तत्वचेचे आजार, हात, पाय, नखे इत्यादि ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स, बुरशीजन्य संसर्गही आदी समस्यांवरही व्हिटॅमिन सी उपयुक्त आहे.
३ व्हिटॅमिन सी बॅक्टेरियांना रोखते. त्यांचा नाशही होतो.
४ व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करावा. मात्र, अतिरेक करू नये.
५ हे व्हिटॅमिन मिळवण्यासाठी आंबट गुणधर्माची फळे म्हणजेच संत्रा, लेमन, मोसंबी आदी उपयुक्त ठरतात.
Visit : policenama.com