आरोग्यनामा टीम : आज आपण व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता म्हणजे काय, याची कारण काय आहेत आणि याची लक्षणं काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच याचं निदान आणि यावर उपचार काय आहेत हेही पाहणार आहोत.
व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेची सामान्य लक्षणं – व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थायमीन हे आपल्या शरीराचं कार्य योग्य पद्धतीनं सुरू राहण्यासाठी आवश्यक असतं. याची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत.
– बेरीबेरी नावाचा रोग होतो. याचे दोन प्रकार हेत. एक म्हणजे ड्राय किंवा कोरडे आणि दुसरा म्हणजे वेट किंवा आर्द्र बेरीबेरी.
– कोरड्या बेरीबेरीत मज्जारज्जूवर परिणाम होतो. रुग्णाला वेदना होतात, थकवा येतो, बधीरपणा जाणवतो आणि हातापायाला मुंग्या येतात.
– हृदयाचे वाढते आकारमान, श्वासोच्छावासाची कमतरता, हातापायांना सूज आणि हृदयाची गती वाढणं ही आर्द्र बेरीबेरीची लक्षणं आहेत.
इतर लक्षणं
1) रुग्ण एनोरेक्सिक होऊ शकतो.
2) वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं.
3) मानसिक आरोग्यावर परिणाम
4) जी लोकं मद्यपान करतात त्यांना थायमीनमुळं वर्निक कोसाकॉफ सिंड्रोम होतो. यात माणसाला समन्वयात कमतरता, स्नायूत अशक्तपणा, दुहेरी दृष्टी तसेच शरीराचा तोल जाणं असा त्रास जाणवतो.
5) मज्जारज्जूचं कायमस्वरूपी नुकसान होणं, कोमात जाणं, हृदय बंद पडणं अशाही समस्या होऊ शकतात.
याची प्रमुख कारणं
1) अपुरा आहार किंवा अयोग्य पद्धतीनं पोषण मुल्यांचं शोषण
2) मद्यपानामुळं थायमीन शरीरात कमी शोषला जातो.
3) मूत्रपिंडांच्या जुन्या रुग्णांना आणि डायुरेटीक्स घेत असलेल्या लोकांना थायमीनच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.
4) कॅन्सर आणि एचआयव्ही बाधितांना याचा धोका जास्त असतो.
याचं निदान आणि उपचार कसे केले जातात ?
रुग्णात आढळणारी लक्षणं, वैद्यकीय इतिहास आणि चाचण्या यावरू व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेचं निदान केलं जातं. रक्ताच्या सेल्स मध्ये थायमीन पायरोफॉसफेटची पातळी तपासायला विशेष चाचण्या केल्या जातात. निदानासाठी थायमीनचे शोषण आणि थायरॉईडचया कामासाठी आवश्यक उत्प्रेरकांची पातळी तपासायला चाचण्या केल्या जातात.
प्राथमिक उपचार देताना तोंडावाटे किंवा शिरेमध्ये इंजेक्शन देऊन थायमीन दिले जाते. यानं लक्षणं लगेच कमी होतात. जर मज्जासंस्थेच्या तक्रारी असतील तर त्या दूर होण्यासाठी वेळ लागतो. उपाचारात प्रामुख्यानं थायमिन आणि काही महिन्यांसाठी थायमिन अॅडमिनीस्ट्रेशन याचा समावेश होतो. संतुलित आहार, थायमिनचे सप्लीमेंट्स यामुळं स्थिती सुधारते. धान्य, मटण, सोयाबिन, दाणे हा थायमिनचा परिपूर्ण स्त्रोत आहे.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.