आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Viral Fever | पाऊस त्याच्यासोबत अनेक आजार सुद्धा घेऊन येतो. आजार पसरवणारे व्हायरस आणि बॅक्टेरिया (Virus and Bacteria) या ऋतूत खूप सक्रिय होतात. या काळात सर्दी होणे सामान्य आहे. (Viral Fever) परंतु ताप येणे जास्त त्रासदायक असते. ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांच्यासाठी हा ऋतू जास्त त्रासदायक असतो (Fever In Monsoon).
पावसाळ्यात अनेक प्रकारचे ताप निर्माण करणारे व्हायरस-बॅक्टेरिया सक्रिय असतात. सर्वात जास्त केस व्हायरल तापाच्या येतात. त्यामुळे पावसाळ्यात व्हायरल तापाची लक्षणे कोणती असतात आणि कोणत्या खबरदारीने तुम्ही ताप टाळू शकता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Viral Fever)
लक्षणे :
1. खोकला (Cough)
2. सर्दी (Cold)
3. ताप (Fever)
4. घसा बसणे/खवखवणे (Sore Throat)
5. उलट्या (Vomiting)
6. पोटदुखी (Stomach Ache)
अशी तापाची लक्षणे दिसल्यास अजिबात गाफील न राहता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काय खावे
– इम्युनिटी वाढवणारी फळे जास्त प्रमाणात खावीत, संत्री, मोसंबी इत्यादी व्हिटॅमिन सी असलेली फळे खावीत. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. पण लक्षात ठेवा की तुम्हाला आधीच सर्दी झाली असेल तर थंड फळे टाळावीत.
– अशुद्ध पाणी पिणे हे आजाराचे सर्वात मोठे कारण आहे, त्यामुळे पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.
– अन्नामध्ये थंड ऐवजी गरम पदार्थांचा समावेश करा. जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका.
– हळद, सुंठ, आले, लवंग, ओवा, हिंग, गुळासारखे गरम पदार्थ जेवणात मिसळून खा.
द्रव पदार्थ घ्या
– पाणी जास्त प्यावे. त्यामुळे डी-हायड्रेशन होत नाही.
– दररोज फळांचा रस प्या. फळांचा रस देखील इम्युनिटी वाढवतो.
– तुळशीसोबत आल्याचा चहा पिऊ शकता.
– उलट्या आणि जुलाबाची समस्या असल्यास लिंबू-पाणी किंवा इलेक्ट्रॉलचे मिश्रण प्या.
भाज्या आणि फळे
– आहारात हिरव्या भाज्यांचा जास्त समावेश करा.
– रोज लसणाचे सेवन करा. त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. लसणामुळे इम्युनिटी वाढते आणि सर्दी-पडशामध्येही ते फायदेशीर आहे.
– सफरचंद, केळी, संत्री यासारखी फळे खा.
– टोमॅटो, बटाट्याची भाजीही चांगली आहे.
काय खाऊ नये
– फ्रीजमध्ये ठेवलेले थंड अन्न खाऊ नका.
– रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया देखील शिळ्या अन्नामध्ये लपलेले असतात. त्यामुळे शिळे अन्न टाळावे.
अशी घ्या काळजी
– उष्णतेमुळे ताप पसरवणारे जंतू नाहीसे होतात. पुन्हा पुन्हा वाफ घ्या, खूप आराम मिळतो.
– सर्दी झाली असेल तर खोकताना, शिंकताना, रुमाल किंवा टिश्यूचा वापर करताना काळजी घ्या.
– शक्य असल्यास सॅनिटायझर वापरा, अन्यथा कोमट पाण्याने आणि साबणाने हात धुत रहा.
– घरात रोज कडुलिंबाचा धूर करा, त्यामुळे ताप पसरवणारे डास मरतात. जंतूही मरतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever
Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम