आरोग्यनामा ऑनलाइन टीम : पावसाळी वातारवणात व्हायरल फीव्हरचा त्रास मुलांसह मोठ्यांनाही होतो. विविध प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे जो ताप येतो त्यास व्हायरल फीव्हर म्हणतात. यावर उपचार करण्याची पद्धत समान असते कारण याचे जवळपास संकेत एकसारखेच असतात. व्हायरल फीव्हर कसा होतो,आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
व्हायरसमधून कंटॉमिनेटेड फूड किंवा बेवरेज घेतल्यामुळे व्हायरल फीव्हर होऊ शकतो. दूषित हवेतून श्वास घेतल्याने श्वासांच्या माध्यमातून व्हायरस बॉडीमध्ये जातात. एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीसोबत संपर्कात आल्यामुळे सुद्धा व्हायरल फीव्हर होतो. व्हायरल फीव्हरवर मनाने औषध किंवा अँटिबायेटिक्स घेऊ नये. कारण ते धोकेदायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेच औषध अथवा अँटिबायोटिक्स घेऊ नये.व्हायरल फीव्हरपासून बचाव करण्यासाठी उकळून गाळलेले किंवा प्यूरीफाय केलेले शुध्द पाणी प्यावे. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे हे नेहमी लक्षात ठेवा.
घरात वापरले जाणारे टॉवेल रोज धुवा किंवा बदलत राहा. बाहेर पडताना, तोंड, नाक झाकून किंवा रुमाल बांधून जावे. डासांपासून बचाव करण्यासाठी रेपेलेंट किंवा मच्छरदानीचा उपयोग करावा. बाहेर खाणे किंवा रस्त्यांच्या कडेला उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी, म्हणजेच थिएटर, मॉल इत्यादी ठिकाणी जाणे टाळावे.व्हायरल फीव्हरवर काही घरगुती उपाय करता येतात. ते परिणाम कारक ठरतात. हे उपाय कसे करावे, ते पाहुयात. पाहिला उपाय करण्यासाठी बटाट्याचे तुकडे व्हेनेगरमध्ये भिजवावेत. हे एखाद्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून डोक्यावर ठेवल्याने फायदा होतो. तसेच लिंबूचे तुकडे कापून तळव्यांवर घासावे किंवा कापलेले तुकडे सॉक्समध्ये टाकून रात्रभर घालून ठेवावे.लसूण बारीक करून एक चमचा मधासोबत खावा. मोहरीच्या तेलामध्ये लसूण तळून त्याने मालिश करावे.चार ग्लास पाण्यात २०-२५ तुळशीचे पान,अद्रकचा तुकडा आणि ३-४ लवंग उकळा. प्रत्येक दोन तासांत हे पाणी प्यावे. कडू लिंबाचे कोमल पान चावून, लिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आणि रूममध्ये लिंबाचे पान ठेवल्याने फायदा होतो.