आरोग्यनामा ऑनलाइन टीम – द्राक्ष, सफरचंद, बार्ली, ओट अथवा तांदळापासून व्हिनेगर तयार केले जाते. आंबवण्याच्या प्रक्रियेचा सहभाग असल्याने व्हिनेगरला एक प्रकारचा वास असतो. व्हिनेगर हे पाश्च्यात, युरोपीय आणि आशियायी देशांमध्ये जेवणात प्राचीन काळापासून वापरले जात आहे. भारतात मात्र व्हिनेगरचा वापर अत्यंत कमी केला जातो. व्हिनेगरमध्ये ४ ते ८ टक्के अॅसेटिक आम्ल असते. ते आरोग्यासाठी लाभदायक आहे.
व्हिनेगर जेवणाची चव दुपटीने वाढवते. दररोज रात्री अॅप्पल साईडर व्हिनेगर घेतल्यास अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळून प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होऊन लठ्ठपणा कमी होतो. घसा खवखवणे, खोकला यासाठी झोपण्याच्या एक तासपुर्वी एक चमचा व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यावे. अॅप्पल साईडर व्हिनेगरच्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे खराब गळादेखील लवकर बरा होतो. अनेक वेळा स्नायू कमजोर झाल्यामुळे पायात वेदना होतात. अशावेळी दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यावे. यामुळे शरीराला पोटॅशियम मिळते.
तसेच अनेक वेळा डायजेशनची समस्या झाल्याने पोटात गॅस होतो. झोप येत नाही. यावेळी एक चमचा मध व एक चमचा अॅप्पल साईडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यावे. रात्री झोपण्याच्या एक तास आधी याचे सेवन करावे. यामुळे जेवण सहज पचते.डायबिटीज रुग्णाच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास त्यांनी व्हिनेगर घ्यावे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे व्हिनेगर घ्या. अनेकदा अॅसिडाटीमुळे पोट मुरडून दुखते. अशा वेळी झोपण्यापूर्वी एक चमचा व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास आराम मिळतो. अनेक लोकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर प्यावे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होऊन दुर्गंध दूर होते.