आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मांसाहारी लोक हे चिकन, मटण, अंडी आणि मासे यांचे भरपूर प्रमाणात सेवन करतात. यामुळे त्यांना मोठ्यापमाणात कॅल्शियम मिळते. शिवाय, भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. अंडी, मांस, दुग्धजन्य पदार्थ, मासे यात जास्त प्रमाणात प्रोटिन असते. त्यामुळे मांसाहारी व्यक्तीला मुबलक प्रमाणा प्रोटिन्स आहारातून मिळत असता. मात्र, शाकाहारी व्यक्ती केवळ रोजच्या जेवणावर अवलंबून राहिल्यास प्रोटिन्सची निर्मिती होत नाही. शाकाहारी लोकांनी शरीरातील प्रोटिनची मात्रा वाढविण्यासाठी अमिनो अॅसीडचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
अमिनो अॅसीडचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांमुळे प्रोटिनची निर्मिती होते. शाकाहारी नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन नियमित केले पाहिजे. पनीर, दही, डाळ, सोयाबीन आणि दररोज एक ग्लास दूध शरीरात आवश्यक प्रोटिन तयार करतात. डाळीतून शाकाहारींना जास्त प्रोटिन मिळतात समज खरा नसून यामुळे शरीरास जास्त प्रमाणात प्रोटिन मिळत नाही. म्हणूनच दुग्धजन्य पदार्थांच्या सेवन शाकाहारी व्यक्तींनी केले पाहिजे.
सिरम प्रोटिन टेस्ट केल्याने शरीरात असलेल्या एल्बुमिन आणि ग्लोबुलिन या दोन प्रमुख प्रोटिनचे प्रमाण तपासता येते. एल्बुमिन रक्त वाहिन्यांमधील रक्ताचे लिकेज कमी करते, तसेच औषधांचा प्रभाव रक्तापर्यंत पोहोचविण्याचे काम करते. तर ग्लोबुलिन हिमोग्लोबिनसोबत मिळून संक्रमणाच्या विरोधात काम करते. प्रत्येकास प्रोटिनची गरज असल्याने प्रोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.