आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उंची जास्त असेल तर व्यक्तीमत्त्व चांगले दिसते. त्यामुळे अनेकजण उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. उंची वाढविण्यासाठी अनेक व्यायाम प्रकार, योगासने आहेत. परंतु, त्याच बरोबर आहारात काही भाज्यांचा समावेश केला तर उंची वाढण्यात मदत होऊ शकते. पालेभाज्यांमुळे शरिरातील हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत होते. यामुळे उंची वाढते. उंची वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पालेभाज्यांचा समावेश करावा, याविषयी आपण माहिती घेवूयात.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये न्युट्रिशनचे प्रमाण जास्त असते. ही भाजी कच्ची खाता येते. परंतु, उकळून खाल्यानंतर ती जास्त लाभदायक आहे. यामध्ये लोह, प्रोटीन्स, कॉल्शियम, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन्स ए आणि सी जास्त असते. या भाजीचा नियमीत आहारात वापर केल्यानंतर उंची वाढण्यात मदत होते.
ब्रसेल्स स्प्राउट्स
गाजराच्या वर्गातील ही भाजी आहे. या भाजीत व्हिटामीन्स, प्रोटीन्स, फायबर, कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. आहारात तिचा समावेश केल्यास हार्मोन्स नियंत्रीत राहतात.
कोलार्ड ग्रीन
या भाजीला ब्राझीलीयन रोपटे म्हणून आळखले जाते. कोलार्ड ग्रीनमध्ये व्हिटामीन्स सी आणि व्हिटामीन्स के जास्त असते. तसेच अँटीकॅन्सर तत्व असतात. यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
वटाना
ही सर्वात जास्त पोषक तत्व असलेली भाजी आहे. नियमीतपणे आहारात या भाजीचा वापर केल्यास शरिरासाठी आणि उंची वाढवण्यासाठी लाभदायक आहे.
बॉक चॉय
ही चायनीज भाजी म्हणून ओळखली जाते. नियमीतपणे आहारात वापर केल्यास उंची वाढते. या भाजीमध्ये मिनरल्स, व्हिटामीन्स, फायबरचे प्रमाण जास्त आहे.
शलजम
शलजम हा गाजरासारखा प्रकार असून ही भाजी आहारात नियमीतपणे घेतल्यास शरिरातील हार्मोन्स संतुलीत राहतात. उंची वाढवण्यासाठी मदत होते. यामध्ये मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर्ससह कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असते.
भेंडी
या भाजीमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर असते. आहारात ही भाजी घेतल्यास शरीर शक्तीशाली हाते. हार्मोनचे प्रमाण वाढते.
पालक
या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम पालकमध्ये २६ किलो कॅलरी उर्जा, २ टक्के प्रोटिन्स, कायब्रोहायड्रेट २.९ टक्के असते. तसेच विविध खनिज द्रव्य असतात.
हे आहेत उपाय
* अश्वगंधा आणि वाळलेल्या मंजुळा उंचीच्या वाढीसाठी लाभदायक आहेत. हा उपाय करण्यासाठी २० ग्रॅम वाळलेल्या मंजुळा, २० ग्रॅम अश्वगंधा आणि २० ग्रॅम साखर घ्यावी. मंजुळा आणि अश्वगंधाच्या मुळ्या बारीक कराव्यात. या मिश्रणामध्ये प्रमाणात साखर टाका. नंतर हे मिश्रण काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावे. रात्री झोपण्याच्या अगोदर रोज दोन चमचा चूर्ण घ्यावे. नंतर गाईचे दुध प्यावे. यामुळे उंची वाढण्यास मदत होते. कमीत-कमी ४० दिवस हा उपाय करावा.
* अश्वगंधा आणि काळे तीळ यांचे नियमीतपणे सेवन केले तर उंची वाढते. हा उपाय करण्यासाठी १ ते २ ग्रँम अश्वगंधा चुर्ण घ्यावे. यामध्ये २ ग्रँम काळे तीळ बारीक करून टाकावेत. हे मीश्रण तयार झाल्यानंतर गाईच्या तुपासोबत सेवन केल्यास उंची वाढण्यास मदत होते.
* अश्वगंधाची २ चमचा पावडर व साखर एक ग्लास दुधामध्ये टाकून ४५ दिवस घेतल्यानंतर उंची वाढते. अश्वगंधा दुधासोबत घेतल्यानंतर जास्त आंबट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.