आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. सब्जाचे बी हे चवीला गोड असून शरीरातला थंडावा देतो.
जाणून घ्या सब्जाचे फायदे –
1) सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
2) नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
3) मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा गुणकारी ठरतो.
4) सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
5) सब्जाच्या सेवन केल्याने अॅसिडिसी कमी होते.
6) सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात.
7) तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.