आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आनंदी जीवनासाठी आरोग्य खूप महत्वाचे आहे. शरीर निरोगी असेल तरच कोणतेही काम उत्साहाने करता येते. पचनशक्ती, वीर्यशक्ती तसेच स्नायुशक्ती मजबूत ठेवायची असेल तर वज्रासन हा एकमेव आणि रामबाण उपाय आहे. वज्रासनाचा अर्थच बलवान असून ते नियमित केल्यास या तिन्ही शक्तींमध्ये वाढ होते.
असे करा वज्रासन
आसनावर दोन्ही पायांचे गुडघे वाकवून दोन्ही पायांच्या टाचांवर बसावे. पायाचे दोन्ही अंगठे एकमेकांशी जुळलेले असावेत. पायाच्या तळव्यावर नितंब ठेवा. कंबर आणि हात ताठ करून गुडघ्यांवर ठेवावेत. तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. दृष्टी समोर स्थिर ठेवावी.
हे फायदे होतील
* शरीराचा मध्यभाग सरळ राहतो.
* श्वासाची गती मंद झाल्याने आयुष्य वाढते.
* दृष्टी वाढते.
* वज्रनाडी अर्थात वीर्यधारा नाडी मजबूत होते. शरीर वज्रासारखे बनते.
* जेवणानंतर या आसनात बसल्याने पचनशक्ती तीव्र होते. जेवण लवकर पचते.
* गॅसचा त्रास दूर होतो. मलावरोध दूर होऊन पोटाचे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात.
* शुक्रदोष, वीर्यदोष, गुडघे दुखी इत्यादी आजार दूर होतात.
* स्नायू मजबूत होतात. स्फूर्ती वाढते. मानसिक निराशा दूर होते.