आरोग्यानामा ऑनलाइन टीम – बहुतांश महिलांना पीरियड्सच्या काळात वेदना होतात. अशा वेदना होणे ही एक सामान्य गोष्ट समजली जाते. मात्र, या वेदनांचा त्रास टाळण्यासाठी अनेक महिला पेनकिलर्सचे सेवन करतात. पेनकिलर घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खुप आवश्यक असते. अन्यथा त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. पीरियड्सच्या काळात पेनकिलर्स घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे, याच्या चुकीच्या सेवनाने कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी आपण महिती घेणार आहोत.
वाढत्या वयात गरज नाही
टीन ऐजमध्ये या काळात पाठदुखीची समस्या जास्त होते. परंतु, वय वाढले की ही समस्या कमी होते. त्यामुळे जास्त वयात पेनकिलर शक्यतो घेवू नये.
दोनपेक्षा जास्त घेऊ नका
पोटात वेदना होत असताना दोन अथवा त्यापेक्षा जास्त पेनकिलर घेतल्यास त्याचे साइड इफेक्ट होऊ शकतात. तसेच इतरही आरोग्य समस्या होऊ शकतात.
माइल्ड डोस फायदेशिर
पीरियड्सच्या काळात खुप वेदना होत असतील तर पेनकिलरचा माइल्ड डोस म्हणजे दोन पेनकिलरपेक्षा कमी पेन किलर घेतल्यास आराम मिळतो. तरीही वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा.
हे होतात साईड इफेक्ट
१ कॉन्सटपिशन अथवा लूजमोशन सुरू होतात.
२ अॅसिडीटीची समस्या होऊ शकते.
३ पोटात अल्सर होऊ शकतो.
४ झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
५ त्वचेवर खाज, जळजळ अथवा चट्टे येऊ शकतात.
६ लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो.