आरोग्यनामा ऑनलाइन टीम : पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांमध्ये अनेक पोषक तत्त्व असल्याने डॉक्टर चांगल्या प्रकृतीसाठी भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. परंतु, काही भाज्या आणि फळांच्या सालीमध्येसुध्दा गुणकारी पोषक तत्त्व असतात. या सालींचा उपयोग करून अनेक आजार बरे होऊ शकतात. फळांच्या आणि भाज्यांच्या सालींमध्ये कोणते गुणधर्म असतात, हे जाणून घेवूयात.
सालींचे औषधी गुणधर्म
१) पपईची साल सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी आहे. ही साल त्वचेवर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. टाचांवर लावल्यास टाचा कोमल होतात.
२) केळीची साल हलक्या हाताने चेहऱ्यावर पाच मिनिटांपर्यत घासल्याने पिंपल्स दूर होतात.
३) केळीची साल दातांवर घासल्यास दात चमकदार होतात.
४) एखादा किडा चावल्यास त्या ठिकाणी केळीची साल घासून लावल्यास आराम मिळतो.
५) सोराइसिस झालेल्या ठिकाणी केळीची साल घासून लावल्यास डाग नष्ट होतात.
६) सुरकुत्यांवर उपाय करण्यासाठी अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये केळ्याच्या सालीची पेस्ट मिसळून चेहऱ्यावर लावावी. यामुळे सुरकुत्या नष्ट होतात. ही पेस्ट चेहऱ्यावर ५ मिनीटे ठेवून नंतर चेहरा थंड पाण्याने धूवावा.
७) पिंपल्स आणि पुरळ नष्ट करण्यासाठी तसेच त्त्वचा मुलायम होण्यासाठी संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर दह्यामध्ये मिसळून त्वचेवर लावावी.
८) संत्र्याची साल बेसन पिठामध्ये एकत्र करून लावल्यास तेलकट त्वचेत विशेष फायदा होतो. यामुळे पिंपल्स नष्ट होतात.
९) मोसंबीच्या सालीमध्ये एक विशेष प्रकारचा सुगंध असलेले तेल असते. या तेलाचा उपयोग मज्जातंतूना आराम देण्यास आणि शांत झोपेसाठी होतो. आंघोळीच्या पाण्यात याचे दोन-तीन थेंब तेल टाकून आंघोळ केल्यास शांत झोप लागते.
१०) बदामची साल आणि बाभळीच्या शेंगाची साल आणि बिया जाळून बारिक कराव्यात. या मिश्रणामध्ये थोडे मीठ टाकून मंजन तयार करावे. यामुळे दाताचे दूखणे दूर होते.
११) खरबूजाची साल खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
१२) बटाट्याची साल चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात.
१३) मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेल तर डाळिंबाची साल उपयोगी आहे. डाळिंबाची साल सुकवून तिची पावडर तयार करावी. एक ग्लास पाण्यात ही एक चमचा पावडर टाकून प्यावी.
१४) भोपळ्याची साल बारिक करून पाण्यासह प्यायल्यास डायरिया बरा होतो.
१५) लिंबूची साल दातावर घासल्यास दात चमकदार होतात.
१६) लिंबू आणि संत्र्याची साल सुकवून चुर्ण बनवावे. याचा दातांसाठी दंतमंजना प्रमाणे वापर केल्यास दात चमकदार होतात.
१७) संत्र्याच्या सालीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता असते. गॅस, उलटी आणि हृदयाचे आजार दूर करण्यास मदत करते. भूक वाढते आणि मळमळ थांबते.
१८) संत्र्याच्या सालीने ताप कमी होतो. सत्र्यांची साल बारिक करून खायला दिल्यास त्याचा फायदा होतो.
१९) केस खूप रुक्ष असल्यास संत्र्याची साल बारिक करून केसांना लावावी. काहीवेळ ठेवून नंतर केस धुवावेत. यामुळे केस सिल्की होतात.
२०) संत्र्याची साल बारिक करून त्यामध्ये गुलाब जल टाकून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
२१) संत्र्याची साल कर्करोग आणि हाडांच्या दुखण्यावर लाभदायक असते.