आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संत्री एक गुणकारी फळ असून ते सर्वांनाच आवडते. मात्र, संत्र्याचे गुणधर्म आणि फायदे अनेकांना महित नाहीत. संत्र्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहे. संत्रीच्या सालीपासून अनेक फायदे होऊ शकतात. संत्रीच्या सालीचे कोणते गुणकारी फायदे आहेत, याविषयी माहिती करून घेवूयात.
लठ्ठपणा, हाडांचा ठिसूळपणा
एका संशोधनानुसार, लठ्ठपणा कमी करण्यासाठी संत्रीची साल गुणकारी आहे. संत्र्याच्या सालीमध्ये लठ्ठपणा आटोक्यात आणण्याची क्षमता आहे. तसेच कर्करोग आणि हाडांचा ठिसूळपणा दूर होतो.
पचनशक्ती
संत्र्याच्या सालीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता असून यामुळे भूख वाढते. पचनक्षमता, गॅस, अॅसिडिटी, मळमळ आणि हार्ट बर्नसारख्या समस्या दूर होतात. संत्रीची साल कृमि नष्ट करते.
सुंदर त्वचेसाठी
संत्रीच्या सालीमध्ये क्लिजींग, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टोरिअल गुण असल्याने पिंपल्सच्या समस्येसाठी गुणकारी आहे. संत्र्याची साल सुकवून पावडर बनवावी. त्यामध्ये दही मिसळून त्वचेवर लावावी. यामुळे त्वचा कोमल आणि चमकदार होते.
रूक्ष केस
केस रुक्ष असल्यास संत्रीची साल फायदेशीर आहे. संत्रीच्या सालीची पावडर बनवून केसांना लावून काही वेळ ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस चमकदार होतात.
काळे डाग
संत्र्याची साल कुटून त्यामध्ये गुलाबजल मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट होतात.