कोथिंबीरीचे औषधी फायदे
कोथिंबीरीमध्ये अँटी फंगल, अँसेप्टिक, डिटॉक्सीफाइड गुण असतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. खाज व पुरळची समस्या असल्यास कोथिंबीरीची पेस्ट लावावी. लगेच आराम मिळेल.
पित्ताचा त्रास असल्यास कोथिंबीरीच्या पानांचा थोडासा रस सेवन करावा.
सूज कमी करण्यात कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबीरीच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.
कोथिंबीरीमध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे अॅनिमिया दूर होतो. अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन ए, सी आणि विविध पोषक तत्वांनी भरपूर असलेली कोथिंबीरी कॅन्सरला दूर ठेवते.
* कोथिंबीरीची चटणी करून खावी. यामुळे शांत झोप लागते. डायबिटीज रुग्णांसाठी ही वरदान आहे. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो.
* कोथिंबीरीच्या सेवनाने दृष्टी चांगली होते. डोळ्यांसाठी हे एक उत्तम औषध आहे.
* कोथिंबीरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होते.
* २० ग्रॅम कोथिंबीरीची पाने थोड्या कापुरामध्ये मिसळून बारीक करावीत. त्यानंतर रस काढावा. नाकाचा घोळाणा फुटला असेल तर या रसाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त येणे बंद होते.
* कोथिंबीरीच्या सुगंधित तेलामध्ये सिटरोनेलोल तत्व असते. हे अँसेप्टिक आहे. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास फायदेशीर ठरते.
* अॅलर्जीमुळे दाह होत असल्यास कोथिंबीरीच्या पानांचा रस आणि लेप गुणकारी आहे.