आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक व्यक्ती आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. सगळ्यांना वाटते की, आपला चेहरा सुंदर आणि चमकदार असावा. त्यासाठी तुम्हाला आता महागड्या क्रिमचा वापर करण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय तुम्हाला सुंदर बनवू शकते. चला तर मग जाणून घेऊया सुंदर दिसण्याचे काही घरगुती उपाय…
रोज लवकर उठल्यावर पाण्यात हळद टाकून पिल्याने अनेक फायदे होतात. हळदीचे पाणी पिल्याने बुद्धी तेज होते. जर तुम्ही हळदीचे पाणी रोज सकाळी पिले तर तुमच्या रक्तामधील घाण साफ होते. त्यामुळे ह्रदयाच्या आजारापासून तुमचा बचाव होतो. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असेल आणि जर तुम्हाला खाज येत असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात हळद टाकून पिण्यास सुरुवात करा.
लीव्हर समस्येने पीडित असलेल्या लोकांसाठी हळदीचे पाणी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. हळदीचे पाणी लीव्हर पेशी बरी करते, हळद आणि पाण्याचे गुण लीव्हरला संसर्ग होण्यापासून रोखतात. हृदयाच्या समस्येने पीडित असलेल्या लोकांनी हळद पाणी प्यावे. हळद रक्त जाड होण्यापासून वाचवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जेव्हा तुम्ही हळदीच्या पाण्याबरोबर लिंबू प्याल तेव्हा शरीरात साठविलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरावर वाढत्या वयाचा परिणाम दिसून येत नाही आणि वृद्धावस्थेची लक्षणे दूर राहतात. हळदीमध्ये फ्री रॅडिकल्स असतात. जे आरोग्य आणि सौंदर्य वाढवते. म्हणूनच दररोज हळदीचे पाणी पिल्याने चेहर्याची चमक वाढते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळे डाग हळू-हळू दूर कमी होतात.