आरोग्यानामा ऑनलाईन टीम : केसगळतीची समस्या अनेकांना भेडसावत असते. याचे प्रमाण वाढले तर टक्कल पडण्याची शक्यता असते. केसगळतीमुळे अकाली वृद्धत्व आल्यासारखे वाटते. केसगळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय असून हे उपाय केल्यास केसगळती थांबू शकते. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबरेल तेलात घालून मिश्रण करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. नंतर थंड पाणी व शाम्पूने केस धुवा.
२ आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करून हे मिश्रण केसांना लावा. सुकल्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन टाका.
३ एका अंड्यातील पांढरा भाग, एक चमचा ऑलिव तेल एकत्र करा. हे मिश्रण फेटून केसांना १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर थंड पाणी व शाम्पूने केस धुवा.
४ एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा. रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. सौम्य शाम्पूने केस धुवा व ते सुकू द्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.
५ नाराळाचे तेल कोमट करून केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा. तासाभराने केस धुऊन टाका. अथवा खोबरे किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा. रात्रभर तसेच ठेवून सकाळी केस धुऊन टाका.
६ लसणाच्या काही पाकळ्या ठेचून खोबरेल तेलात टाकून ते गरम करा. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा. ३० मिनिटे लावून ठेवा. नंतर केस धुऊन टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.
Visit : arogyanama.com