आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शाम्पू करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु बहुतेक शाम्पूमध्ये केमिकल असल्यामुळे केसांचे नुकसान होण्याचा धोका असतो. परंतु आपण शाम्पूऐवजी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून केस स्वच्छ करू शकता.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
१) अंड्यातील पांढरा भाग-
केस धुण्यासाठी आपण अंड्याचा पांढरा भाग देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात २ अंड्यातील पांढरा भाग काढून घ्या.नंतर हे टाळू आणि केसांवर १० मिनिटे लावा. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा. यामुळे केस स्वच्छ होतील तसेच केसांचे पोषण होईल.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
२) कोरफड जेल –
कोरफड जेल पोषक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. केसांना कोरफड जेल लावल्याने केस मुळांपासून मजबूत होतात.यासोबत डोक्यातील कोंडा, केसांची समस्या कमी होण्यास मदत होते तसेच केस लांब, दाट, मऊ आणि चमकदार होतील. यासाठी ४-५ चमचे कोरफड जेल घ्या व संपूर्ण केसांवर लावून १० मिनिटे मालिश करा. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
३) कडुलिंबाची पाने-
शैम्पूच्या जागी आपण कडुलिंबाची पाने वापरू शकता. हे केसांची स्वच्छता तसेच डोक्यातील कोंडयापासून मुक्त होण्यास मदत करेल. यासाठी कडुलिंबाची पाने धुऊन बारीक करून मिश्रण तयार करा. तयार मिश्रण टाळू आणि संपूर्ण केसांवर लावा. १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने केस धुवा.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
४) मुलतानी माती-
मुलतानी माती केस साफ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे शैम्पूच्या जागी वापरू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध आणि २ चमचे दही याचे मिश्रण तयार करावे. तयार झालेल्या मिश्रणाने केसांची मालिश करा. नंतर पाण्याने केस धुवा. हे केसांना आर्द्रता प्रदान करेल तसेच डोक्यातील कोंडयाची समस्या दूर होईल. केस सुंदर, जाड, कोमल दिसतील.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या