आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही खाल्ल्यानंतर तोंडाची स्वच्छता न ठेवल्यास, दिवसातून दोनदा ब्रश न केल्यास, पोट साफ होत नसल्यास, तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी काहीजण माउथ फ्रेशनरचा वापर करतात. परंतु, घरगुती माउथ फ्रेशनरचा वापर केल्यास चांगला परिणाम दिसून होतो. घरगुती माउथ फ्रेशनर कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत माउथ फ्रेशनर
संत्री, लिंबू
संत्री, लिंबू यामुळे तोंडात लाळ तयार होते. यामुळे प्लाकपासून तयार झालेले अॅसिड निष्क्रिय होते. तोंडातील डेड सेल्स आणि अन्नाचे कण नाहीसे होतात.
पार्सली
पार्सलीमध्ये जीवाणूंचा नाश करणारे क्लोरोफिल असल्यामुळे जेवणानंतर पार्सली खावे.
लवंग
एक लवंग तोंडात ठेवावी. तोंडाची दुर्गंधी घालवण्याचा रामबाण उपाय आहे.
दालचिनी
दालचिनीच्या काही काड्या चावाव्यात. तसेच त्या चहामध्ये टाकू शकता. दालचिनीच्या ५-६ काड्या पाण्यात उकळवून हे पाणी थंड झाल्यावर गुळण्या करा.
वेलची
एक वेलची चघळल्यास ताबडतोब तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.
बडीसोप
तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी बडीसोप खावी.
पुदिना
पुदिन्याची २-३ पाने खावीत अथवा त्यापासून बनवलेला चहा प्यायल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.