आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांच्या कोपराची त्वचा ही जाड आणि काळवंडलेली असते. यामुळे रंग गोरा असूनही सौंदर्यात बाधा येते. कोपराची त्वचा स्वच्छता न राखल्याने काळवंडते, असा समज अनेकांचा असतो, परंतु यामध्ये तथ्य नसून कोपरावर मृत पेशी साठल्याने तो निस्तेज होतो, काळवंडतो. हा काळपटपणा दूर करण्यासाठी साधे घरगुती उपाय असून ते केल्यास चांगला फरक दिसून येतो.
करा हे उपाय
१. लिंबाचा एक तुकडा कोपरावरील काळ्या डागावर घासावा. तीन तासानंतर तो पाण्याने स्वच्छ करून त्यावर मॉयश्चरायजर लावावे. यामुळे काळवटपणा दूर होतो.
२. दोन चमचे साखरेमध्ये एक चमचा कोकोनट ऑईल मिसळा. हा स्क्रब कोपरावर लावल्याने त्वचा उजळते.
३. दही व लिंबाचे मिश्रण कोपरावर लावा. पंधरा मिनिटांनी स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यावर मॉयश्चरायजर लावा.
४. दोन चमचे बेकिंग सोड्यात थोडे दूध टाका. चांगले हलवून हे मिश्रण बोटांनी कोपरावर लावा. दहा मिनिटांनी धुवून टाका.