आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तणाव हा शरीराचे वेगवेगळ्याप्रकारचे नुकसान करतो. हे नुकसान शारीरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे असते. सतत तणावग्रस्त राहिल्याने जीवनावर खुप विपरित परिणाम होतो. अनेक आरोग्य समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात. काही गंभीर आजारही मागे लागू शकतात. तसेच तणाव जास्तकाळ राहिल्यास डिप्रेशनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 अॅक्युपंक्चरमध्ये शरीरातील प्रेशर पॉईंट्स बारीक सुईंच्या मदतीने टोचले जातात. यामुळे शरीर मोकळे होते व तणाव कमी होण्यास मदत होते.
2 तणाव कमी करण्यासाठी आता कीर्तनाचाही आधार घेतला जातो. परदेशातही हा प्रयोग केला जात आहे.
3 न्यूझीलंडमध्ये तणाव कमी करण्यासाठी जॉर्बिंग केले जाते. भारतातही खेळ रुजू लागला आहे.
4 मसाज सुद्धा एक उत्तम उपाय आहे. यामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल राखला जातो.
5 विशेष प्रकारच्या माशांच्या मदतीने पायांना फिश स्पा केला जातो. यामुळेही तणाव कमी होतो.