आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांना वारंवार लघवीला जाण्याची समस्या असते. सतत लघवीला होण्याची विविध कारणे आहेत. त्यापैकी प्रौढांमध्ये आढळून येणारे एक महत्वाचे कारण म्हणजे पौरुष हार्मोन एंड्रोडोजन होय. यामुळे लघवीची समस्या निर्माण होते. प्रोस्टेट ग्रंथिचा आकार वाढत गेल्यास मूत्र मार्गावर दबाव पडून हळुहळु लघवीमध्ये अडथळे येतात. ही ग्रंथी फक्त पुरूषांमध्ये असते. साधारणता ४५ व्या वर्षानंतर या ग्रंथीच्या वजनात वाढ होते आणि लघवीमध्ये अडथळे येतात.
ही आहेत लक्षणे
१) वारंवार लघवीला होणे. सुरूवातीस दिवसा आणि नंतर रात्रीही सुद्धा हा त्रास होतो.
२) मूत्र विसर्जन करण्यास खूप त्रास होतो. नंतर थेंबा-थेंबाने लघवी येते.
३) काहींना लघवी करताना खूप त्रास होतो. लवकर लघवी न होणे हेदेखील या आजाराचे लक्षण आहे.
हे लक्षात ठेवा
* वरील लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लघवी आणि रक्ताची तपासणी, सोनोग्राफी करून घ्या.
* सोनोग्राफीद्वारे प्रोस्टेटचे वजन, विसर्जनानंतर मूत्राशयात शिल्लक राहणारे मूत्र याची माहिती मिळते.
* जास्त प्रमाणात मूत्र शिल्लक राहणे हे गंभीर आहे.
* प्रोस्टेट कॅन्सरचे निदान रक्तात प्रोस्टेट स्पेसीफिक एंटीजनच्या परिक्षणाने केले जाते.
हे आहेत उपचार
१) अनेकांना औषधोपचाराने चांगला फरक पडतो.
२) औषधे घेऊन शस्त्रक्रिया काही काळापर्यंत टाळली जाऊ शकते.
३) वाढलेले वय, एनेस्थीसियाचा त्रास, या कारणामुळे डॉक्टर अनेकदा औषधोपचाराला प्राधान्य देतात.