आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Eating Habits) यूरिक अॅसिडचे प्रमाण (Uric Acid Level) सतत वाढत जाते. यूरिक अॅसिड (Uric Acid) चे प्रमाण वाढणे ही एक समस्या आहे जी आहारात जास्त प्रमाणात प्रोटीन (Protein) घेतल्याने वाढते. युरिक अॅसिड (Uric Acid) वाढण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत. वाढते वजन म्हणजेच लठ्ठपणा (Obesity) हे देखील यूरिक अॅसिड वाढण्याचे कारण आहे. काही प्रकरणांमध्ये, ही समस्या अनुवांशिक (Genetic) असते. जे लोक जास्त तणावाखाली असतात त्यांच्या शरीरात युरिक अॅसिड जमा होऊ शकते.
आहारात सुधारणा करून युरिक अॅसिड नियंत्रित (Uric Acid Control) करता येते. यावर नियंत्रण न ठेवल्यास अनेक आजार शरीराला सतावू लागतात. यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, यूरिक अॅसिड डाएट चार्ट (Uric Acid Diet Chart), तसेच व्यायामाचे (Exercise) पालन करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया (Digestion) सुरळीत राहते.
युरिक अॅसिड (Uric Acid) नियंत्रित करण्यासाठी प्युरीनचे (Purine) सेवन नियंत्रित करावे. यूरिक अॅसिड डाएट चार्टचे अनुसरण करून, आपण प्युरिनचे सेवन 100-150 मिलीग्रामने कमी करू शकता. या आजारामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. यूरिक अॅसिड लेव्हल वाढल्याने शरीरात कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया (High uric acid level Causes).
1. सांधेदुखीची समस्या होऊ शकते (Joint Pain Problem) :
शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. सांध्यातील वेदना आणि सूज याला गाउट म्हणतात. युरिक अॅसिडची पातळी सामान्य असतानाही ही समस्या उद्भवू शकते.
2. किडनीची समस्या होऊ शकते (Kidney Problem) :
शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास किडनीचा त्रासही (Kidney Problem) होऊ शकतो. युरिक अॅसिड वाढल्याने लघवी बाहेर पडणे कठीण होते. यूरिक अॅसिड शरीरातील रक्ताद्वारे किडनीपर्यंत पोहोचते आणि ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते, परंतु जेव्हा किडनी ते फिल्टर करू शकत नाही, तेव्हा हे अॅसिड शरीरातच जमा होऊ लागते. त्याच्या वाढीमुळे किडनीवर दबाव येतो आणि किडनीच्या समस्या निर्माण होतात.
3. हात-पायाच्या बोटांना सूज (Swelling Of Fingers And Toes) :
युरिक अॅसिड वाढणे ही एक समस्या आहे ज्यामुळे बोटांना सूज येते किंवा सांध्यामध्ये गाठीची समस्या होते.
4. हाय ब्लडप्रेशरचा धोका वाढतो (Increases Risk Of High Blood Pressure) :
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. आहारात जास्त मीठ (Salt) खाल्ल्याने हाय ब्लडप्रेशरचा धोका वाढू शकतो.
5. युरिक अॅसिडमुळे होऊ शकते स्टोनची समस्या (Uric Acid Can Cause Stone Problems) :
युरिक अॅसिडचे क्रिस्टल (Uric Acid Crystals) युरिन पाईपमध्ये (Urine Pipe) जमा होऊ लागतात आणि मुतखडा तयार होतो.
युरिक अॅसिड स्टोन झाल्यास या लक्षणांमध्ये पाठीच्या खालच्या दोन्ही बाजूंना तीव्र वेदना, ओटीपोटात दुखते (Abdominal Pain),
या वेदना दूर होत नाही, लघवीत रक्त येणे (Bleeding In Urine), उलट्या (Vomiting) किंवा मळमळ (Nausea),
ताप (Fever) आणि थंडी वाजून येणे आणि दुर्गंधीयुक्त लघवी (Foul-Smelling Urine) यांचा समावेश होतो.
6. हात आणि पायांच्या बोटांमध्ये वेदना (Pain In Fingers And Toes) :
युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांना हात आणि बोटांमध्ये असह्य वेदना होऊ शकतात. या वेदना कधीकधी सुई टोचल्यासारख्या होतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Uric Acid | know the high uric acid causes and problems