आरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्होडका एक अल्कोहलिक ड्रिंक असले तरी यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. व्होडकाचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी होऊ शकतो. तसेच याचा वापर करून त्वचा निरोगी, तजेलदार होऊ शकते. त्वचेच्या उपायासाठी व्होडकामध्ये कापूस भिजवून त्याने चेहरा साफ करावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा निरोगी राहते. व्होडका हा मद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा असतो. यातील विविध गुणांमुळे इतर मद्यासोबत व्होडका मिसळून कॉकटेल तयार केले जाते. औषधी स्वरुपात सुद्धा व्होडकाचा उपयोग केला जातो. इतर मद्यांच्या तुलनेत व्होडकाचा वाईट प्रभाव खूप कमी आहे.
या समस्यांवर आहे लाभदाय
* कानात वेदना होत असल्यास व्होडकाचे काही थेब टाकावे. ५ मिनिटानंतर कान स्वछ करून घ्यावा. या उपायाने कान दुखायचा थांबतो. व्होडकामुळे कानातील बॅक्टीरिया नष्ट होतात, आणि कानदुखी थांबते.
* खूप ताप आला असल्यास पाण्यामध्ये थोडी व्होडका टाकून त्यामध्ये एक कपडा भिजवून पिळून घ्यावा. हा कपडा डोक्यावर ठेवल्यास ताप कमी होतो.
* एखाद्या अवयामध्ये असह्य वेदना होत असतील तर थंड पाण्यामध्ये थोडी व्होडका टाकून आइस क्यूब तयार करावा. हा आइस क्यूब वेदना असलेल्या ठिकाणी लावल्यास वेदना थांबतात.
* व्होडका एक प्रभावी हेअर कंडीशनर आहे. शॅम्पूच्या बाटलीत थोडासा व्होडका मिसळावा. या शॅम्पूने केस धुतल्यास केसांचे मूळ मजबूत होते. आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. या उपायाने केसांचा तेलकटपणा दूर होतो आणि केस मऊ होतात.
व्होडकाचे अन्य काही उपयोग
१) सजावटीसाठी लावलेली फुलं जास्तकाळ टवटवीत ठेवण्यासाठी एक बाटलीभर पाण्यामध्ये व्होडकाचे काही थेंब आणि एक चमचा साखर टाकावी. हे पाणी फुलांवर स्प्रे केल्याने फुलं बराचवेळ ताजी, टवटवीत राहतात.
२) काच, दागिने स्वच्छ करण्यासाठी एक कप व्होडका आणि एक कप पाणी एकत्र करून काच अथवा दागिने पुसून घ्यावेत. ते चमकू लागतात.
३) बूट स्वच्छ करण्यासाठी थोडासा व्होडका बुटांवर टाकून कपड्याने बूट पुसून घ्यावेत. बुटांची चमक वाढते.