आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपले डोळे आपल्या आजाराबद्दल आपल्याला सांगत असतात. जर डोळ्यांकडे व्यवस्थित लक्ष दिले तर लक्षात येईल की आपले डोळे आपल्याला अनेक रोगांबद्दल माहिती देतात. तुम्ही पाहिले असेल की डॉक्टर तुम्हाला उपचारा दरम्यान तुमचे डोळे तपासतात. याबाबत मॅनचेस्टरचे रोजन आय असोसिएट प्रोफेसर एमानुअल रोजन यांनी सांगितले की, डोळ्याच्या रोटिनाच्या तपासणीने आपल्याला कॅन्सर, मधुमेह आणि हुद्यरोग सारख्या आजारांची माहिती देतात.
पिवळे डोळे – पिवळे रंगाचे डोळे जांडिसचे लक्षण असू शकतात. मात्र बरेच जास्त फॅटयुक्त जेवन केल्याने आणि पाणी कमी पिल्याने तुमचे डोळे पिवळे दिसू शकतात. फळाचे सेवन कमी केल्याने देखील डोळे पिवळे पडू शकतात. जर तुमच्या डोळ्यांचा रंग पिवळा होत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.
डोळ्यांच्या आसपास सुज –
थॉयराईड कमी झाल्यास डोळ्याच्या आसपास सुज येते. कंप्युटरवर जास्त काम केल्याने देखील डोळ्यांना सुज येते. तसेच डोळ्यात पाणी आल्याने देखील आणि इन्फेकशन झाल्यावर डोळ्यांना सुज येते. परंतू बऱ्याच वेळा याचे कारण थॉयराईड असू शकते. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांकडे चेकअप करत राहणे आवश्यक आहे.
डोक्यात ट्युमर –
बऱ्याच वेळा आपली नजर कमजोर होत जाते, त्यामुळे आपल्याला कमी दिसण्यास सुरुवात होते. आपण आपल्या समोरील वस्तूना नीट पाहू शकत नाही, नीट लक्ष देऊन पाहिले तर लक्षात येते की, डोळ्याचा रंग बदलला आहे. असे असल्यास सावध राहा हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते, त्यामुळे लगेच डॉक्टारांशी संपर्क साधा.