आरोग्यनामा ऑनलाईन- उन्हात गेल्यानंतर जास्त घाम काखेत येतो. यामुळे येथील त्वचेवर मॉईश्चरने बॅक्टेरियांची वाढ होऊन स्किन इन्फेक्शनचा(underarms infection) धोका वाढतो. काखेतील त्वचेवर घामामुळे इन्फेक्शन झाल्यास बारिक बारिक दाणे येणे, जळजळ होणे, कपड्याचे घर्षण झाल्याने खूप आग होणे, खाज सूटणे, असे त्रास सुरू होतात. काखेतील हे स्किन इन्फेक्शन(underarms infection) टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 रोज दोनवेळा अंघोळ करा. अंघोळ करत असताना अंडर आर्म्सची स्वच्छता करा.
2 डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रिम, गोळ्या अँटीबायोटीक्स घ्या.
3 खाज सूटत असेल तर खाजवू नका. कारण यामुळे इन्फेक्शन इतरत्र पसरण्याची शक्यता असते.
4 अँटी बॅक्टेरिअल क्रिममुळे त्वचेवरील खाज दूर होते.
5 भरपूर पाणी प्या.
6 हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.
7 शक्य असल्यास सूती कपडे घाला.
8 जास्त गरमीत थांबू नका.
9 इन्फेक्शन असल्यास अँटी बॅक्टेरिअल साबण वापरा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.